Gold Silver Rate Today : सोने-चांदी आले टप्प्यात! झाली जबरदस्त घसरण

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने दिवाळीपूर्वीच स्वस्ताईचा मुहूर्त गाठला आहे. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी आनंदवार्ता आणली आहे. ऑक्टोबर महिन्यात 4 हजार रुपयांच्या दरवाढीने ग्राहकांना घामटा फोडला होता. दिवाळीत किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत होती. पण या आठवड्यात दोन्ही धातूत स्वस्ताई आली आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी आले टप्प्यात! झाली जबरदस्त घसरण
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा आनंद आता दुप्पट होणार आहे. दागिन्यांची हौस, सोने-चांदी गाठिशी ठेवण्याचा आणि त्यात भर टाकण्याचा संकल्प भाव उतरल्याने पूर्ण होऊ शकतो. ऑक्टोबरमधील 4 हजार रुपयांच्या दरवाढीने अनेकांनी दिवाळीत सोने-चांदी खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आठवड्यात या रुसलेल्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीत (Gold Silver Price Today 9 November 2023) स्वस्ताई आल्याने ग्राहकांना हायसे वाटले आहे. त्यांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहे. धनत्रोयदशीपर्यंत घसरण कायम राहिल्यास सराफा पेठेत गर्दी उसळेल.

सोने 1650 रुपयांनी स्वस्त

गेल्या दहा ते बारा दिवसांत सोन्याने मोठा दिलासा दिला. सोने 1650 रुपयांनी स्वस्त झाले. या आठवड्यात 400 रुपयांची घसरण झाली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. 8 नोव्हेंबर रोजी किंमती 160 रुपयांनी घसरल्या. आता 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 1700 रुपयांनी स्वस्ताई

चांदीने गेल्या आठवड्यात 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. पण नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,540 रुपये, 23 कॅरेट 60,298 रुपये, 22 कॅरेट सोने 55,455 रुपये झाले. 18 कॅरेट 45,405 रुपये, 14 कॅरेट सोने 35,416 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,209रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

ग्राहकांचा उत्साह कायम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धनत्रयोदशीला ग्राहकांचा उत्साह कायम असेल,अशी अपेक्षा पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केली. सध्या बाजारपेठेत असलेली तेजी आणि येणारा लग्नसराईचा काळ यामुळे गेल्या वर्षीपेक्षा धनत्रयोदशीच्या दिवशी विक्रीमध्ये 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. सोन्यामध्ये आणखी वाढ होण्याआधी खरेदी करावी म्हणून ग्राहकांचा यावर्षी सोने खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग्सचा कल दिसून येत आहे. दरवर्षी भारतात धनत्रयोदशीला अंदाजे एकूण 40 टन सोन्याची विक्री होते.त्यापैकी 20 ते 25 टक्के म्हणजे 10 टन ही महाराष्ट्रात होते, अशी माहिती त्यांनी दिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.