Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोन्याने गाठला हजाराचा टप्पा, चांदी पण सुसाट, 10 ग्रॅमसाठी इतके रुपये मोजा

Gold Silver Price Today : सोने-चांदीने गेल्या तीन दिवसांतच मोठी झेप घेतली. सोन्याने तीन दिवसांत तर एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 19 एप्रिलपासून थंडावलेल्या भावात 3 मेपासून पुन्हा उलथापालथ दिसून आली. आज सोने-चांदी कितीने महागले जाणून घ्या..

Gold Silver Price Today : सोन्याने गाठला हजाराचा टप्पा, चांदी पण सुसाट, 10 ग्रॅमसाठी इतके रुपये मोजा
सोन्याची मोठी झेप
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 10:04 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने गेल्या तीन दिवसांतच मोठी झेप घेतली. सोन्याने तीन दिवसांत तर एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 19 एप्रिलपासून थंडावलेल्या भावात 3 मेपासून पुन्हा उलथापालथ दिसून आली. संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Market) सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याने जोरदार उसळी घेतली. सोन्याच्या भावात एकाच दिवशी तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे भाव कडाडले असले तरी सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी ग्राहकांनी एकच झुंबड उडाली होती.

अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम अमेरिकेची केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्हने (American Federal Reserve) अंदाजाप्रमाणे व्याजदरात 25 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर लागलीच दिसून आला. या घोषणेनंतर स्पॉट गोल्डमध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. युएस गोल्ड फ्युचरमध्ये 1.3 टक्क्यांची वाढ होऊन ते 2,063.20 डॉलर प्रति औंसवर पोहचले. त्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून आला. सोन्याने जोरदार मुसंडी मारली.

असा वधारला भाव 3 मे रोजी सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 4 मे रोजी सोन्यात पुन्हा 500-540 रुपयांची दरवाढ झाली. 5 मे रोजी सोन्याच्या भावात 10 रुपयांची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांतच सोन्याने हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे आतापर्यंत थंडावलेल्या बाजारपेठेत पुन्हा उलथापालथ दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या धोरणानुसार, सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 5 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,160 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 62,340 रुपये आहे.. सोन्याने आज प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांची वाढ नोंदवली. तर चांदीने तीन दिवसांत हजार रुपयांचा टप्पा गाठला एक किलोमागे 1100 रुपयांची वाढ झाली. 2 मे रोजी एक किलो चांदी 76,100 रुपये होती. 5 मे रोजी हा भाव 77,100 रुपये किलो होता.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.