Gold Silver Price : पाडव्यापूर्वीच सोने-चांदीच्या भाव वाढीची गुढी! किंमती वधारल्याने खरेदीदारांना फुटला घाम

Gold Silver Price : सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत. त्यामुळे लग्न सराईच्या हंगामात वधू-वर पित्याच्या आनंदात विरजण पडले आहेत. तर वऱ्हाडींच्या चिंतेतही भर पडली आहे. पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या किंमतींनी भाव वाढीची गुढी उभारली आहे.

Gold Silver Price : पाडव्यापूर्वीच सोने-चांदीच्या भाव वाढीची गुढी! किंमती वधारल्याने खरेदीदारांना फुटला घाम
आजचा भाव किती
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 11:10 AM

नवी दिल्ली : पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price) भाव वाढीची गुढी उभारली आहे. सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत. त्यामुळे लग्न सराईच्या हंगामात वधू-वर पित्याच्या आनंदात विरजण पडले आहेत. तर वऱ्हाडींच्या चिंतेतही भर पडली आहे. सोमवारपासून सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याने उसळी घेत, 57000 रुपये प्रति तोळ्याचा भाव गाठला. तर चांदी 63000 रुपये प्रति किलोवर पोहचली. तरीही उच्चांकी भावापेक्षा सोने 1900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 16300 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय किंमतीत कुठलाही कर, घडवणीचा खर्च वा इतर शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे सराफा बाजारातील (Sarafa Bazar) भावात तफावत दिसते.

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. हा भाव 56968 रुपयांवर पोहचला. तर यापूर्वी शुक्रवारी सोने (Gold Price Update) 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. त्यावेळी भाव 55669 रुपये होता. सोन्यासोबत चांदीनेही दरवाढीची सलामी दिली. सोमवारी चांदी 1875 रुपयांनी महागली. 63666 रुपये प्रति किलो हा भाव होता. शुक्रवारी हा भाव 61791 रुपये प्रति किलो होता.

गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली आहे. आज 14 मार्च, 2023 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून आली. सोमवारपेक्षा आज मंगळवारी, 22 कॅरेट सोन्यात 700 रुपये प्रति तोळा वाढ झाली. काल हा भाव 52,600 रुपये होता. आज हा भाव 53,300 रुपये प्रति तोळा झाला. तर 24 कॅरेट सोन्यात 760 रुपयांची वाढ झाली. 57,370 रुपयांहून दर 58,130 रुपये प्रति तोळा झाला.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. त्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागते.  वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय किंमतीत कुठलाही कर, घडवणीचा खर्च वा इतर शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे सराफा बाजारातील भावात तफावत दिसते.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.