Gold Silver Rate Today | आज सोने उतरले, दरात घसरण, चांदीचा भाव कमी, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

Gold Rate Today : गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्यातील घसरणीचे सत्र सुरुच आहे. चांदीचे दर ही कमी झाले आहेत. काय आहेत आजचे भाव जाणून घेऊयात.

Gold Silver Rate Today | आज सोने उतरले, दरात घसरण, चांदीचा भाव कमी, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
काय आहेत आज सोन्याचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 4:32 PM

Gold Silver Price Today News | डॉलर (Dollar) सध्या मजबूत स्थितीत आहे. तर रुपयाची (Rupee) अवस्था फार बिकट आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याच्या किंमतीवर (Gold Rate Today news) कमालीचा दबाव दिसून येत आहे. मंदीच्या चाहुलमुळे सोन्याचे भाव वायदे बाजारातही (MCX) घसरले आहेत. केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली आहे. आता 7.5 टक्क्यांऐवजी 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर इंडेक्स (Dollar Index) तेजीत आहे. या सर्व घडामोडीचा सोन्यावर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील सर्वात निचांकी स्तरावर (Lowest Level) आहेत. पण भारतीय सराफा बाजारावर म्हणावा तसा परिणाम अद्यापही दिसून आलेला नाही. कालच्या तुलनेत आज सोने-चांदीचे दर किंचित घसरले आहेत. गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,200 रुपये होती. तर चांदी (Silver Rate Today News) 56,600 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,400 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 54,767 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली, गेल्या आठवड्यात हाच भाव 56,427 रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडवळीवरील शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. तसेच हे दरपत्रक सूचक आहे. स्थानिक पातळीवर या दरात बदल होण्याची शक्यता असते.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...