Gold Silver Rate Today | सोन्याचे दर वाढले की झाले कमी? चांदीचा आजचा भाव काय? जाणून घेऊयात आजचे दर

Gold Rate Today | गेल्या पाच महिन्यांत, सोन्यासाठी हा सर्वात मजबूत आठवडा राहिला. वायदे बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर पुन्हा कडाडणार आहे. सोने पुन्हा चमक दाखवणार आहे.

Gold Silver Rate Today | सोन्याचे दर वाढले की झाले कमी? चांदीचा आजचा भाव काय? जाणून घेऊयात आजचे दर
आजचे सोने चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 12:30 PM

Gold Silver Rate Today | 1 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर होत्या. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) मंदीच्या (Recession) भीतीने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत. त्याचा फारसा परिणाम बाजारावर अजून दिसला नाही. डॉलर घसरल्याने आणि रोख्यातील उत्पन्न घसरल्यामुळे भारतीय सराफा बाजारावर परिणाम दिसत असला तरी आज सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. पण गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 782 रुपयांची वाढ झाली आहे. वायदे बाजाराचा विचार करता, सकाळी 9.39 वाजता, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 0.29 टक्क्यांनी घसरून 10 ग्रॅमसाठी 51,279 रुपये आणि चांदीचा भाव 0.65 टक्क्यांनी घसरून 57,991 रुपये प्रति किलोग्रामवर होता. तर सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Rate Today) फारसा बदल दिसून आला नाही. काल ज्या किंमती बाजारात होत्या. त्याच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी आणि या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आल्या.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,200 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,490 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 580 रुपये आहे.काल हा दर 584 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या सहामाहीत सोने वाढण्याची अपेक्षा

सोन्या-चांदीच्या दर वाढीबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 आधार अंकांची वाढ केली आहे. पण सप्टेंबर आणि त्यानंतर व्याजदरात तेवढी आक्रमक वाढ न करण्याचा दिलासा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या तिमाहीत घसरली. त्यामुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

हा आठवडा सर्वात मजबूत

सोन्यासाठी गेल्या पाच महिन्यांत जुलैचा शेवटचा आठवडा सर्वात मजबूत ठरला. तसे पाहता अमेरिकेची अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले आहे. जून तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 0.9 टक्क्यांनी घसरली. पहिल्या तिमाहीत ही घट 1.6 टक्के होती. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीत सराफा बाजारात सोन्याची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे मत आहे. दुसऱ्या सहामाहीत सोन्याची मागणी वाढण्याची आणि सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.