Gold Silver Rate Today : सोने-चांदीने गाठला महागाईचा मुहूर्त, इतके वाढले भाव
Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ऐन दिवाळीत ग्राहकांना निराश केले. या आठवडाभरात दोन्ही धातूच्या किंमती सातत्याने घसरणीवर होत्या. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात कोण गर्दी उसळली होती. सोने-चांदी खरेदीची धांदल उडाली असतानाच दरवाढ झाली. सोने-चांदीच्या इतक्या वाढल्या किंमती?
नवी दिल्ली | 11 नोव्हेंबर 2023 : धनत्रयोदशीला सोने आणि चांदीने दरवाढीचा मुहूर्त गाठला. बाजारात या दिवशी खरेदी शुभ मानण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. सोने-चांदी गेल्या आठवड्यापासून घसरणीवर होते. या आठवड्यातही मौल्यवान धातूचे भाव चांगलेच घसरले. सोने-चांदीच्या स्वस्ताईने ग्राहक खरेदीचा उत्साह होता.सततच्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण सोने-चांदीत (Gold Silver Price Today 11 November 2023) शुक्रवारी दरवाढ झाली. त्याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसला. त्यांना दागदागिने खरेदीसाठी जादा दाम मोजावे लागले. इतके वाढले सोने-चांदीचे भाव?
घसरणीला सोन्याचा ब्रेक
मागील दहा-बारा दिवसांत सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. ऑक्टोबर महिन्यात चार हजारांची विक्रमी दरवाढ झाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला घसरण झाली. 31 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली होती. 10 नोव्हेंबर रोजी सोन्यात 300 रुपयांची दरवाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 800 रुपयांची दरवाढ
या आठवड्याच्या सुरुवातीलाच 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 10 नोव्हेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,240 रुपये, 23 कॅरेट 59,999 रुपये, 22 कॅरेट सोने 55,180 रुपये झाले. 18 कॅरेट 45,180 रुपये, 14 कॅरेट सोने 35,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,416 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.