Gold Silver Price : ग्राहकांना फुटला घाम, दररोज वाढतोय सोन्याचा दाम, चांदीची ही लकाकी, काय आहेत आजचे दर?
Gold Silver Price : सोन्याचे दर प्रत्येक दिवशी एक नवीन उच्चांक गाठत असल्याने ग्राहकांना घाम फुटला आहे..
नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात शनिवारी सोने-चांदीचे दर (Gold Silver Price) जाहीर झाले. ताज्या दरांवर नजर टाकली तर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळते, तर चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येते. https://ibjarates.com/ या अधिकृत संकेतस्थळानुसार, सोन्याच्या किंमतीत तेजी कायम आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचत घसरण दिसून येते.
999 शुद्धतेच्या सोन्याने 52,000 रुपयांचा टप्पा पार केला असून 999 शुद्धतेची चांदी किलोमागे 61,000 रुपयांच्या पुढे आहे. सोन्याचे भाव 56,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव तेजीत आहेत.
ibjartes.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याचा दर शनिवारी 52,952 रुपये होता. तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,706 रुपये, 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,473 रुपये, 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 39,689 रुपये होता.
तर 585शुद्ध सोन्याचा दर 30,957 रुपये झाला. सोन्याचे दरात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सोन्याची वाटचाल 56 हजारांकडे सुरु आहे. 999 शुद्ध एक किलो चांदीचा दर घसरुन 61,200 रुपये झाला.
https://www.goodreturns.in/या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,600 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,020 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,100 रुपये आहे.
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,100 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 53,100 रुपये आहे.
चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 609 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं.
इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.