मुंबई : अक्षय तृतीया (Akshay Tritiya) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. तीन मे रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त माणण्यात येते. या दिवशी सोन्याची (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याला मोठी मागणी असते. ग्राहक आपआपल्या सोईनुसार सोन्याची खरेदी करतात. कोणी प्रत्यक्ष सोन्याची खरेदी करते तर कोणी डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करते. या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. काल सोन्याच्या दरात किंचित तेजी दिसून येत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपये इतके होते तर आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 400 रुपये असून, त्यात तोळ्यामागे दीडशे रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 800 रुपये इतके आहेत.