Today Gold Rate : लग्नसराईत सोने-चांदी चमकले, आजचा भाव काय

Today Gold Rate : लग्नसराईत सोने-चांदीच्या भावाने उचल खाल्ली आहे. उच्चांक गाठल्यानंतर सोने घसरले असले तरी सोने पुन्हा कधीही उसळी घेण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने-चांदीचा भाव पुन्हा भडकणार आहे. आजचा भाव किती आहे?

Today Gold Rate : लग्नसराईत सोने-चांदी चमकले, आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर सोन्याच्या किंमतीत (Gold Price) जोरदार वाढ झालेली आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव (MCX Gold Price) 57,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. तर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. या पूर्ण आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price) तेजीचे सत्र कायम आहे. किरकोळ घसरणी दिसली तरी सोने पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी चांदीचा भाव 67,700 रुपयांच्या जवळपास व्यापार करत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने आता 60,000 रुपयेच नाही तर 62 हजारांपर्यंत धडक देऊ शकते. तर चांदी 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

वायदे बाजारात सोन्याच्या भावात 0.04 टक्क्यांची वाढ झाली. सोन्याची किंमत 57240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 57215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर चांदीच्या किंमतीत 0.10 टक्क्यांची वाढ झाली. आज चांदीचा भाव 67,699 रुपये प्रति किलो आहे. काल हा भाव 67,551 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने भरारी घेतली आहे. सोन्याचा भाव वाढलेला आहे. आज सोन्याच्या भावात 0.31 टक्के वाढ होऊन ते 1,890.70 डॉलर प्रति औस होता. तर चांदीत 1.10% वाढ दिसून आली. चांदीचा भाव 22.42 डॉलर आहे. परदेशात सोन्याचा भाव वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

इंडियन बुलियन आणि ज्वैलर्स असोसिएशन India Bullion And Jewellers Association-IBJA ) नुसार, आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो आहे. या भावात आणखी वाढीचा शक्यता आहे.

सोन्याच्या किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

  1. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो.
  2. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916
  3. तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते
  4. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात
  5. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते
  6. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते
  7. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो
  8. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात
  9. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.