सोन्या, चांदीच्या दरात तेजी, सोने प्रति तोळा 53 हजारांवर तर चांदी 69 हजार रुपये किलो
Gold-Silver Price Today: सोन्या-चंदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53039 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी 69025 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
Gold-Silver Price Today : सोन्या-चंदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी (Gold, silver prices hike) दिसून येत आहे. 24 कॅरट सोन्याचा (Gold) दर प्रति तोळा 53039 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी (silver) 69025 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49000 एवढा आहे. मंगळवारच्या तुलनेमध्ये आज सोन्याच्या दरात प्रति तोळा 417 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलोमागे 416 रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर दिवसांतून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी मार्केट उघडल्यानंतर आणि दुसरे म्हणजे संध्याकाळी. त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने बदल होत असतो. सोन्याचा दर हा सोने अधिक दागिने घडवण्याचा चार्ज असा ठरवला जात असल्याने प्रत्येक शहरात सोन्याचे दर हे थोड्या- फार फरकाने कमी अधिक होतात. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53450 इतका आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49000 एवढा आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज मुंबईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 450 रुपये एवढा आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर 49 हजार रुपये एवढा आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील आज सोन्याचे दर वाढले असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53 हजार 550 रुपये एवढा आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर 49 हजार 100 रुपयांवर पोहोचले आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर 49 हजार 100 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा भाव नागपूरप्रमाणेच 53 हजार 550 एवढा आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. भारत हा सोन्याची आयात करणारा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. चालू वर्षात जानेवारीपासूनच सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. त्यात भर पडली ती म्हणजे रशिया, युक्रेन युद्धाची युद्धामुळे पुरवठा साखळी खंडीत झाल्याने देखील सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. भारतामध्ये दागिन्यांसाठी मोठ्याप्रमाणात सोन्याला मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने आयात करावे लागते. येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी कडाडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
सोन्या, चांदीच्या दरात तेजी, सोने प्रति तोळा 53 हजारांवर तर चांदी 69 हजार रुपये किलो
महागाईचा आणखी एक झटका; ‘उबेर’ नंतर आता ‘ओला’नेही वाढवले भाडे; भाड्यात 16 टक्क्यांपर्यंत वाढ
शेअर बाजारात तेजी; सेंसेक्समध्ये 350 अंकांची वाढ, टाटा स्टील टॉप गेनवर