Gold Silver Price : सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली उसळी, पटकन टाका एक नजर

Gold Silver Price : आज सोने-चांदीच्या किंमतींनी उसळी घेतली, इतके वाढले आज भाव

Gold Silver Price : सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली उसळी, पटकन टाका एक नजर
Gold Silver Rate
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) आज 11 जानेवारी 2023 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतींनी उसळी घेतली. सोन्याच्या किंमती (Gold Rate Today) आज 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त होत्या. तर चांदीही चमकली. आज चांदीचा भाव (Silver Price Today) 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक होता. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,084 रुपये होती. तर 999 शुद्धतेची चांदी प्रति किलो 68,304 रुपये होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच सोने-चांदीची मागणी वाढल्याने भावात वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (Reserve Bank of India-Gold Demand) गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा मुबलक नाही तर मोठा साठा केला आहे. केंद्रीय बँकेची सोने खरेदी सुरुच आहे. जगात चीन हा सोन्याचा सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion And Jewellers Association) भाव जाहीर केले. त्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,974 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा भाव वधारुन आज सकाळी 56,084 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुद्धेच्या आधारावर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली.

सराफा बाजारातील अधिकृत संकेतस्थळ ibjarates.com नुसार, आज सकाळी 10 ग्रॅम 995 शुद्ध सोन्याचे भाव वधारले. आज भाव 55,859 रुपये झाले. तर 916 शुद्ध सोन्याचा दर आज 51,373 रुपये होता.  सोमवारपेक्षा हे भाव कमी असले तरी मंगळवारपेक्षा भाव वाढलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

750 शुद्ध सोन्याच्या दरातही वाढ झाली. हा भाव 42,063 रुपयांवर पोहचला. 585 शुद्ध सोने आज महाग झाले. सोन्याचा दर 32,809 रुपये झाला. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 68,304 रुपये झाली. भावात दोन दिवसांत चढउतार दिसून येत आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.