आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोने-चांदी महागली; जाणून घ्या दर
परदेशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सुरक्षित पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवल्याचे सांगितले जाते. | gold rate
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा उसळी घेतली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर 496 रुपयांनी वाढून प्रतितोळा 50, 297 रुपयांवर जाऊन पोहोचला. तर चांदीचा दर 2,249 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 69, 477 रुपयांवर जाऊन पोहोचला. (Gold and Silver price hike in Domestic and international market)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आण चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. परदेशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सुरक्षित पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवल्याचे सांगितले जाते.
सोने आणि चांदीचे दर का वाढले?
आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध संकेतांमुळे सोने आणि चांदीचा दर वाढला. अमेरिकेकडून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी 900अब्ज डॉलर्सच्या पॅकेजला सहमती दर्शविली आहे. पुढील महिन्यात हे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव वधारताना दिसले होते.
आठ महिन्यांत सोन्याची आयात घटली
यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात सोन्याची आयात 40 टक्क्यांनी घटून 12.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही आयात घटल्याचे सांगितले जाते. सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्याच्या तुटीवर परिणाम होतो. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये भारतामध्ये 20.6 अब्ज डॉलर्स इतक्या मुल्याच्या सोन्याची आयात झाली होती.
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे भांडवली बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले
Gold Price : सोने खरेदी करण्याची हीच ती वेळ?; सोनं 56000 पर्यंत जाण्याची शक्यता
आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम
(Gold and Silver price hike in Domestic and international market)