जळगाव: ऐन लग्नसराईत जळगावातील सुवर्ण बाजारात मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उच्चांकी भाव असलेले सोने (Gold) व चांदीची चमक फिकी पडताना दिसून येत आहे. घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. (Gold and Silver rates in Maharashtra)
गेल्या आठवड्यात सोने-चांदीचे दर सातत्याने वाढले होते.सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो एक हजार 500 रुपयांनी घसरण होऊन चांदी प्रति किलो 68000 रुपये आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 500 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोने प्रति तोळा 46600 रुपयांवर आले.
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ कायम असल्याने सोने 47 हजारांच्या पुढेच होते मात्र सोने 46900 रुपयांवर आले. त्यानंतर ते सतत 47 हजारांच्या पुढेच होते.पुन्हा सोने प्रति तोळा 46700 आज सोन रुपयांवर येऊन दर 47 हजारांच्या खाली आहेत.
सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोने व चांदीचे दर वाढतात असा आजवरचा अनुभव आहे. परंतु, यावर्षी सुवर्णबाजारात उलट परिस्थिती आहे. लग्नसराई सुरू असताना सोने व चांदीचे दर घसरले आहेत. घटलेली मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेला सट्टा ही त्या मागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. अशा परिस्थितीत लग्नाचे दागिने तसेच आभूषणांना मागणी कमी झाली आहे. याचाही सुवर्ण बाजारावर परिणाम झाला आहे.
ब्रोकर – लक्ष्य (₹ / 10 ग्राम)
– मोतीलाल ओसवाल : ₹ 50,000/-
– पॅराडाईम कमोडिटी : ₹ 49,000/-
– अॅक्सिस सिक्युरिटीज : ₹ 49,000/-
– आनंद राठी : ₹ 49,000/-
– एसएमसी कॉमट्रेड : ₹ 49,000/-
– एंजल कमोडिटी : ₹ 48,000/-
– चॉइस ब्रोकिंग : ₹ 48,000/-
– कोटक सिक्युरिटीज : ₹ 47,000/-
– ट्रस्टलाईन : ₹ 47,000/-
– पृथ्वी फिनमार्ट : ₹ 47,000/-
संबंधित बातम्या:
सोन्यात गुंतवणुकीचे बरेच पर्याय; परंतु नफ्यावर द्यावा लागणार कर, नेमकी योजना काय?
Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
(Gold and Silver rates in Maharashtra)