Gold Silver Return : सोने-चांदीने केले झटपट श्रीमंत, 100 दिवसांत अशी लागली लॉटरी!

Gold Silver Return : सोने-चांदीने मजल दरमजल न करता, थेट झेप घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ज्यांनी गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली. त्यांच्या घरी तर श्रीमंती पाणी भरत आहे. त्यांना सोने आणि चांदीने लखपती, कोट्याधीश केले आहे.

Gold Silver Return : सोने-चांदीने केले झटपट श्रीमंत, 100 दिवसांत अशी लागली लॉटरी!
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:23 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने मजल दरमजल न करता, थेट झेप घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ज्यांनी गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली. त्यांच्या घरी तर श्रीमंती पाणी भरत आहे. त्यांना सोने आणि चांदीने (Gold And Silver Price) लखपती, कोट्याधीश केले आहे. दिवाळीपूर्वी दोन्ही धातू स्वस्त होते. दिवाळीपासून दोन्ही धातूंनी दरवाढीची सलामी दिली आहे. हे वर्ष, 2023 गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहे. गेल्या दुसऱ्या पर्यांयापेक्षा सोने-चांदीने बक्कळ कमाई करुन दिली आहे. सोने-चांदीने खरेदीदारांना झटपट श्रीमंत केले आहे. इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सोने आणि चांदीतील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे.

असा झाला फायदा 100 दिवसांत भारतीय वायदे बाजाराने गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा दिला आहे. इतर गुंतवणूक पर्यांयापेक्षा सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरली. तर चांदीने गेल्या 100 दिवसांत 7 टक्के परतावा दिला. 2023 मध्ये सोने आणि चांदीने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले. यापूर्वीचे विक्रम मोडीत काढत त्यांनी नवीन विक्रम नावाव केला. वर्ष 2020 पासून दोन्ही धातूंनी अनेक शतकी खेळी खेळली. गेल्या 100 दिवसांत तर सोने आणि चांदीने अनेकांना झटपट श्रीमंत केले आहे.

डिजिलट गोल्डचा फायदा प्रत्यक्ष सोने खरेदी नुकसानदायक असू शकते. सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न असतो. तसेच त्याच्या सुरक्षिततेबाबतही काळजी असते. सोन्याचे दागिने, तुकडे कुठे ठेवणार ही काळजी लागलेली असते. तर डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. ग्राहकाच्या वतीने इन्शुर्ड वॉल्टसमध्ये हे सोने साठवले जाते. त्यामुळे फिजिकल गोल्डसंबंधीत सर्व अडचणी दूर ठेवण्यात मदत मिळते. यासाठी तुमच्याकडे केवळ इंटरनेट वा मोबाईल बँकिंगची आवश्यकता असते. तुम्ही घरबसल्या, इतर कोणत्याही ठिकाणाहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकता.

हे सुद्धा वाचा

गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा

  1. 30 डिसेंबर 2022 रोजी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 55,017 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  2. 10 ​एप्रिल 2023 रोजी म्हणजे 100 दिवसानंतर सोन्याचा भाव 5,021 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला
  3. याचा सरळ अर्थ ग्राहकांना 100 दिवसांत सोन्याने 5,021 रुपयांचा फायदा झाला
  4. सोन्याने या 100 दिवसांत गुंतवणूकदारांना 9.12 टक्के कमाई करुन दिली
  5. या 100 दिवसांत सोन्याच्या भावात प्रति तोळा 473 रुपयांची घसरण पण दिसून आली
  6. सोमवारी व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 59,912 रुपये प्रति तोळा होता

चांदीच्या भावात जोरदार उसळी

  1. 30 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी चांदीचा भाव 69,413 रुपये प्रति किलो होता
  2. 10 ​एप्रिल 2023 रोजी म्हणजे 100 दिवसांनी चांदीचा भाव 74,324 रुपये प्रति किलोवर पोहचला होता
  3. म्हणजे 100 दिवसांनी चांदीचा भाव 4,911 रुपये प्रति किलो परतावा दिला
  4. चांदीने गुंतवणूकदारांना या कालावधीत 7.07 टक्क्यांनी कमाई करुन दिली
  5. 100 दिवसांत चांदीच्या किंमतीत 246 रुपये प्रति किलोची घसरण झाली
  6. सोमवारी व्यापारी सत्रात सोन्याचे भाव 74,057 रुपये प्रति किलोवर पोहचले

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.