Gold Bond : झाली का तयारी, या योजनेत स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी

Gold Bond : स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 11 सप्टेंबर रोजी ही योजना सुरु करण्यात आली. या गुंतवणुकीने ग्राहकांना मालामाल केले आहे. केंद्र सरकार योजनेची हमी घेते.

Gold Bond : झाली का तयारी, या योजनेत स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 10:26 AM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : सोन्यावाणी परतावा हवा असेल तर गुंतवणूक पण चांगल्या ठिकाणी करणे आवश्यक असते. केंद्र सरकारची ही योजना अशीच सोन्यावाणी आहे. या योजनेत गुंतवणुकीचा आज शेवटचा दिवस आहे. सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीम 2023-24 (Sovereign Gold Bond Scheme) मध्ये गुंतवणुकीचा 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. या योजनेतील ही दुसरी मालिका आहे. ही योजना 11 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली होती. या योजनेत केंद्र सरकार सराफा बाजारातील भावापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देते. सरकार त्यावर चांगला परतावा तर देतेच पण तुमच्या गुंतवणुकीची हमी पण घेते. सुवर्ण रोखे योजनेत नागरिकांना पाच दिवस स्वस्तात सोने खरेदीची संधी देण्यात आली होती. योजनेचा आज शेवटचा दिवस आहे. या योजनेने आतपर्यंत मोठा परतावा दिला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये काय

सुवर्ण रोखे योजनेत ग्राहकांना 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदी करता येते. ते 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करतात. त्यावर वार्षिक व्याज पण सरकार देते. ही योजना आठ वर्षांसाठी आहे. आतापर्यंत या योजनेने ग्राहकांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदाराला एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करता येते. तर संस्थांना कमाल 20 किलो सोने खरेदीची परवानगी आहे.

हे सुद्धा वाचा

असा आहे भाव

केंद्र सरकार गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज देते. योजनेतंर्गत ऑनलाईन सोने खरेदीवर 50 रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात येते. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सोन्याचा भाव 5,923 रुपये निश्चित करण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदी केल्यास 5,873 रुपये प्रति ग्रॅम भाव आहे. एका आर्थिक वर्षांत ग्राहक जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने खरेदी (Gold Price Today 15 September 2023) करु शकतो. तर कमीत कमी 1 ग्रॅम सोने खरेदी करता येते.

येथे करा खरेदी

नागरिकांना स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचे (Stock Exchanges), NSE आणि BSE येथून खरेदी करता येईल. डीमॅट खात्याच्या आधारे स्वस्तात सोने खरेदी करता येते.

जबरदस्त परतावा

या योजनेचा कालावधी 8 वर्षे आहे. परंतु 5 वर्षांनी या योजनेतून बाहेर पडता येते. ही योजना 2015 मध्ये सुरु झाली होती. 2015-16 मध्ये या योजनेत सोन्याचा भाव 2,684 रुपये प्रति ग्रॅम होता. तर 2023-24 या दुसऱ्या मालिकेत सध्या 5,923 रुपये भाव आहे. म्हणजे गेल्या सात वर्षांत या योजनेत जवळपास 120 टक्के परतावा मिळाला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.