Gold Rate Hike : 10 ग्रॅम सोन्यामध्ये फ्रीज, कूलर आणि एससी, असे वधारले सोने

Gold Rate Hike : सोने खरेदी करणे आता सोपे राहिले नाही. सोने इतके वधारले की 10 ग्रॅम सोन्यामध्ये फ्रीज, कूलर आणि एससी येऊ शकते.

Gold Rate Hike : 10 ग्रॅम सोन्यामध्ये फ्रीज, कूलर आणि एससी, असे वधारले सोने
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत फसवणूक
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 3:01 PM

नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करणे सोपे राहिले नाही. गेल्या दीड वर्षांत सोन्याचे भाव सातत्याने वधारले. सोने-चांदी चढउतार होत आहे. सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडले आहे. 10 ग्रॅम सोनेच्या भावात फ्रीज, कूलर आणि एससी तीन ही वस्तू येतात. सराफा बाजारात आणि वायदे बाजारात (MCX) सोन्याचा भाव वधारला आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,200 रुपये आहे. सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.

ऑगस्टचा भाव काय ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.21 टक्के तेजीसह वधारला आहे. हा भाव 59,765 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. तर जुलैच्या डिलिव्हरी चांदीचा भाव 0.59 टक्के तेजीसह 73,405 रुपये प्रति किलोवर आहे.

11 हजार रुपयांनी महागले गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये सोन्याचा भाव 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. आता हा भाव जोरदार वाढला. हा भाव वाढून 59,765 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर पोहचले. चांदी पण या काळात जोरदार वधारली. गेल्या वर्षी 64,041 रुपये प्रति किलो चांदी होती तर आज हा भाव 73,405 रुपये प्रति किलो झाला आहे.

हे सुद्धा वाचा

11 वर्षांत भाव डबल

  1. गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
  2. 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
  4. एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
  5. चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
  6. चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली

गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.

सुवर्ण धोरण सुवर्ण धोरणाअंतर्गत, केंद्र सरकार सोने मुद्रीकरण योजना घेऊन आले. तर दुसरीकडे वन नेशन वन गोल्ड प्राईस हे स्वप्न साकारण्यासाठी इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज सुरु केले. परंपरागत गुंतवणूकदारांना फिजिकल गोल्डच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी सुवर्ण रोखे योजना सुरु केली. त्यावर व्याजासहीत दरवाढीचा लाभ दिला. मे 2014 नंतर सुवर्ण धोरणाचा असा फायदा झाला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.