Gold Silver Price Today : आठवड्याभरात सोनं 1000 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरातही तेजी, झटपट वाचा ताजे दर
राम नवमीमुळे (Ram Navami) आज शेअर बाजार आणि कमोडिटी बाजार बंद आहेत, म्हणजेच आज MCX वर कोणताही व्यवसाय केला जात नाही.
मुंबई : राम नवमीमुळे (Ram Navami) आज शेअर बाजार आणि कमोडिटी बाजार बंद आहेत, म्हणजेच आज MCX वर कोणताही व्यवसाय केला जात नाही. दरम्यान, काल सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. तर चांदीच्या भावातही मजबुती नोंदवण्यात आली. (Gold get Costlier Rs 1000 in one week, Silver also shines)
एमसीएक्सवरील सोन्याचा जून वायदा दर मंगळवारी 10 ग्रॅममागे 440 रुपयांच्या वाढीसह 47829 रुपयांवर बंद झाला. सुरुवातीला दरांमध्ये कोणताही फरक नव्हता, मात्र व्यवसाय वाढत गेला तसतशी किंमतीत सुधारणा होत गेली. शेवटच्या काही तासांत सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. इंट्रा डे मध्ये सोन्याने 47900 रुपयांची पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारच्या तुलनेत या आठवड्यात सोने 854 रुपयांनी महागलं आहे.
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर (12-16 एप्रिल)
- दिवस सोने (MCX जून वायदा)
- सोमवार 46419/10 ग्रॅम
- मंगळवार 46975/10 ग्रॅम
- बुधवार 46608/10 ग्रॅम
- गुरुवार 47175/10 ग्रॅम
- शुक्रवार 47353/10 ग्रॅम
दोन आठवड्यांपूर्वीचे सोन्याचे दर (5-9 एप्रिल)
- दिवस सोने (MCX जून वायदा)
- सोमवार 44598/10 ग्रॅम
- मंगलवार 45919/10 ग्रॅम
- बुधवार 46362/10 ग्रॅम
- गुरुवार 46838/10 ग्रॅम
- शुक्रवार 46593/10 ग्रॅम
चांदी 1100 रुपयांनी महागली
चांदीचा दर प्रतिकिलोमागे मंगळवारी 68760 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी इंट्रा डे दरम्यान चांदी 69372 रुपयांवर गेली गेली होती. गेल्या आठवड्यातील चांदीच्या दरांची मंगळवारच्या दरांशी तुलना केली तर लक्षात येईल की, आठवड्याभरात चांदी 1100 रुपयांनी महागली आहे.
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर (MCX – मे वायदा) (12-16 एप्रिल)
- दिवस चांदी (MCX – मे वायदा)
- सोमवार 66128/किलो
- मंगळवार 67656/किलो
- बुधवार 67638/किलो
- गुरुवार 68540/किलो
- शुक्रवार 68684/किलो
दोन आठवड्यांपूर्वीचे चांदीचे दर (5-9 एप्रिल)
- दिवस चांदी (MCX – मे वायदा)
- सोमवार 64562/किलो
- मंगळवार 65897/किलो
- बुधवार 66191/किलो
- गुरुवार 67501/किलो
- शुक्रवार 66983/किलो
सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून
सोन्याची किंमत ठरविणार्या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.
मार्चमध्ये सोन्याची आयात वाढली
भारत सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सोन्याच्या मागणीपैकी 70 ते 80 टक्के मागणी अन्य देशांमधून आयात केली जाते. मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये आयात शुल्काची घट आणि किमती कमकुवत झाल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर गेली होती.
संबंधित बातम्या
Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये
(Gold get Costlier Rs 1000 in one week, Silver also shines)