Gold Silver Price : स्वस्ताईचा रंगोत्सव! सोन्यात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Gold Silver Price : गेल्या महिन्यात सोन्याने अनेकांची झोप उडवली होती. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण आता पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव चढउतार होत असले तरी विक्रमी भावापर्यंत त्याने उडी घेतली नाही.

Gold Silver Price : स्वस्ताईचा रंगोत्सव! सोन्यात गुंतवणुकीची सुवर्णसंधी
आजचा सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:37 AM

नवी दिल्ली :  गेल्या महिन्यात सोन्याने अनेकांची झोप उडवली होती. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण आता पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव (Gold Price) चढउतार होत असले तरी विक्रमी भावापर्यंत त्याने उडी घेतली नाही. त्यामुळे रंगोत्सवात स्वस्ताईची संधी चालून आली आहे. विक्रमी भावापेक्षा शुद्ध सोने 2300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही (Silver Price) लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव घसरला. सध्या खरेदीदारांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे तर स्वस्त चांदीमुळे पण अनेकांची चांदी होत आहे.

सध्या सोन्याचा भाव 56700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 67000 रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही किंमतीत धातूत चढउतार दिसून आला. प्रत्येक दिवशी सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे. काही दिवस सोन्याच्या भाव वधारले तर काही दिवस भावात नरमाई दिसून आली. शुद्ध सोन्यात 150 रुपयांची वाढ दिसून आली. तर चांदीने प्रचंड उसळी घेतली आहे. किलोमागे चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वधारला आहे. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या आठवड्यापासून फारसा बदलला नाही. 22 कॅरेटचा भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत वधारुन ती 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

गेल्या पंधरवाड्यात 25 फेब्रुवारी रोजी शुद्ध सोन्याचा भाव 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

  1. गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,880 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,580 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.