Gold Return : सोन्यामुळे वर्षभरात गुंतवणूकदारांना लॉटरी, 20.3 रिटर्न, ग्राहकांची झाली चांदी, 2025 मध्ये पुन्हा चमकणार नशीब?
1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65 हजारांच्या घरात होते. तर IBJA नुसार, या 30 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 76,194 रुपये आहे. यंदा सोन्याने मोठी भरारी घेतली आहे. सोन्याने या वर्षात ग्राहकांना 20.3 रिटर्न दिला. चढउताराच्या सत्रात गुंतवणूकदारांना सोन्यावाणी परतावा मिळाला.
गेल्या वर्षीप्रमाणेच सोन्याने ग्राहकांना मोठा परतावा दिला. सोन्याने यंदा मोठी घौडदौड केली. वर्षाच्या सुरुवातीला 63-65 हजारावर असणारे सोने 81 हजारांच्या घरात पोहचले. 1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65 हजारांच्या घरात होते. तर IBJA नुसार, या 30 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 76,194 रुपये आहे. यंदा सोन्याने मोठी भरारी घेतली आहे. सोन्याने या वर्षात ग्राहकांना 20.3 रिटर्न दिला. चढउताराच्या सत्रात गुंतवणूकदारांना सोन्यावाणी परतावा मिळाला.
अनेक घटकांचा दिसला परिणाम
सोन्याच्या किंमतीवर अनेक घटकांचा परिणाम दिसला. काही महिन्यात तर सोन्याने डोळे दिपवणारी भरारी घेतली. ग्राहकांचा अंदाज सोन्याने पक्का केला. मोठी उसळी घेतली. सुरूवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला. या वर्षात 18 जुलै रोजी सोन्याची किंमत 76,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 31 ऑक्टोबर रोजी जागतिक मंदी, महागाईच्या वार्तांमुळे, डॉलरमधील घडामोडींमुळे सोन्याने हनुमान उडी घेतली. सोने थेट 81,740 रुपयांवर पोहचले.
यंदाही युद्धाच्या झळा दिसून आल्या. रशिया-युक्रेन युद्धात अधून-मधून जोर येतो. तर इकडे इस्त्रायलने इराण, हिजबुल्लाह आणि हमासविरोधात मोर्चा उघडला होता. या वॉर झोनमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मालमत्ता यापेक्षा गुंतवणूकदारांनी सोन्यात जादा गुंतवणूक केली.
PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष डॉ. सौरभ गाडगीळ यांनी मिंटला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, गेल्या काही दिवसात सोने निखरले आहे. किंमतीत बदल दिसला. सोने ग्राहकांसाठी अजूनही गुंतवणुकीचा आवडता पर्याय ठरला आहे. भूराजकीय तनाव, महागाई, डॉलरची भूमिका यामुळे सोन्याने मोठी झेप घेतली आहे. भविष्यातही प्राप्त परिस्थितीत चढउतार दिसेल. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा होईल. योग्यवेळी सोन्यात केलेली गुंतवणूक ग्राहकांना जोरदार परतावा देईल.
परिस्थितींमुळे आणि इतर घटकांमुळे 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसला तर सोन्यात घसरण झाल्यावर केलेली खरेदी ही ग्राहकांसाठी उजवी ठरेल. त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळेल, असा विश्लेषकांचा दावा आहे. या वर्षाच्या अखेरीस सोन्याने ग्राहकांना 20.3 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सोन्यातील गुंतवणुकीने सोन्यासारखा परतावा दिल्याने ग्राहकांची यंदा चांदी झाली आहे. तर चांदीतील गुंतवणूक पण सोन्यावाणी ठरली आहे. अनेक तज्ज्ञ गुंतवणूक पोर्टफोलिओत ग्राहकांनी सोने आणि चांदीचा समावेश करावा असा सल्ला देत आहेत.