Gold Silver Price Today : सोन्याची राघोभरारी! रेकॉर्ड मोडीत निघणारच, किंमती सूसाट

Gold Silver Price Today : सोन्याने उच्चांक गाठला आहे. यापूर्वीच्या किंमतीची जवळपास त्याने बरोबरी केली आहे. नवीन विक्रमासाठी सोने सज्ज झाले आहे. आज किंवा उद्या सोने त्याचा पूर्वीचा रेकॉर्ड तोडेल असा अंदाज आहे. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता.

Gold Silver Price Today : सोन्याची राघोभरारी! रेकॉर्ड मोडीत निघणारच, किंमती सूसाट
आजचा सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 9:10 AM

नवी दिल्ली : सोने आज नवीन भावाला गवसणी घालणार आहे. सोन्याच्या किंमती (Gold Silver Price) सातत्याने चढत आहेत. आज तर सोन्याने उच्चांक गाठला आहे. यापूर्वीच्या किंमतीची जवळपास त्याने बरोबरी केली आहे. नवीन विक्रमासाठी सोने सज्ज झाले आहे. आज किंवा उद्या सोने त्याचा पूर्वीचा रेकॉर्ड तोडेल असा अंदाज आहे. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. आज अथवा उद्या सोने त्याचा हा विक्रम मोडीत काढणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याच्या या जोरदार उसळीने सर्वांचेच तोंडचे पाणी पळाले आहे. तर गुंतवणूकदारांना कमाईची नवीन संधी मिळाली आहे. सोन्याच्या आजच्या भावाने वधू पित्याला मात्र दागिन्यांसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. चांदी (Silver Price Today) पण आज लकाकली आहे.

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी भावात, सोन्याने 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. 18 मार्च रोजीच्या भावाने हे सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार आहेत. सोन्याने हनुमान उडी घेतल्याने नवीन विक्रमाकडे त्याने आगेकूच केली आहे. गेल्या महिन्याभरातील विश्रांती एका आठवड्यातच त्याने भरुन काढली. या आठवड्यात गुरुवारी वगळता सोने-चांदीने मुड बदलत तुफान बॅटिंग केली आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर चांदीनेही दरवाढीची गुढी उभारली आहे.

शनिवारी, 18 मार्च रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव गगनाला भिडले. 22 कॅरेट सोने प्रति तोळा 250 रुपयांनी वाढले. हा भाव आज 53,950 रुपये प्रति तोळा झाला. तर 24 कॅरेट सोन्यात 270 रुपयांची वाढ होऊन, या किंमती 58,840 रुपये प्रति तोळ्यावर पोहचल्या. आठवड्याभरातच सोन्याने 3300 रुपयांची उसळी घेतली आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

किंमती एकदम सूसाट

  1. शनिवारी 18 मार्च रोजी सोन्यात 270 रुपयांची वाढ
  2. दोन दिवसांत भावात 570 रुपयांची वाढ, सोने 58,840 रुपये प्रति तोळा
  3. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले
  4. गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला
  5. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 100, 110 रुपयांची घसरण झाली होती
  6. बुधवारी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली
  7. मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला
  8. 13 मार्च रोजी सोमवारी सोने 1299 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले
  9. सोन्याचा भाव प्रति तोळा 56968 रुपयांवर पोहचला

चांदी पण लकाकली

  1. चांदीत गुरुवारी प्रति किलो 500 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा भाव किलोमागे 69000 रुपये झाला
  2. शुक्रवारी चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली, हा भाव 69,200 रुपये इतका झाला
  3. शनिवारी चांदीत किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली
  4. 18 मार्च रोजी चांदीचा एक किलोचा भाव 69800 रुपये झाला
  5. देशातील अनेक शहरात आज चांदीने 73,100 रुपये प्रति किलोचा भाव गाठला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.