Gold Silver Rate Today : जुलैच्या सुरुवातीलाच सोन्याचा धडाका, चांदीचा दिलासा

Gold Silver Rate Today : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याने सलामी दिली. चांदीने मात्र दिलासा दिला. शनिवार-रविवारी सराफा बाजारात गर्दी उसळते. दोन्ही धातूच्या किंमतीत असा फरक दिसला. काय आहे भाव..

Gold Silver Rate Today : जुलैच्या सुरुवातीलाच सोन्याचा धडाका, चांदीचा दिलासा
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली : जूनचा शेवटचा दिवस आणि जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्याने सलामी दिली. पहिल्याच दिवशी सोन्याने उसळी घेतली. तर चांदीने मात्र दिलासा दिला. गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे दरात (Gold Silver Price Today) मोठी तफावत दिसून आली नाही. डॉलर सध्या मजबूत आहे. रशिया-युक्रेन युद्धात आता युरोपला ओढण्याची कवायत सुरु आहे. त्याचा मोठा परिणाम सर्वदूर दिसेल. डॉलर मजबूत राहिला. कच्चा तेलाच्या किंमतीत अजून घसरण जर झाली. तर सोने-चांदी दणकावून आपटतील. अमेरिकेन केंद्रीय बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना केल्या आहेत. पण बेरोजगारीवर अमेरिकेला उत्तर सापडलेले नाही. रोजगार उपलब्ध झाल्यास डॉलरचा रुबाब वाढेल. सोने-चांदीच्या किंमती नवीन रेकॉर्ड करणार नाहीत. सोने आणि चांदी दबावाखाली असेल, असा दावा काही ब्रोकरेज फर्म करत आहे. येत्या दिवसात चित्र स्पष्ट होईल. सध्या दोन्ही धातूंच्या किंमतीत अशी तफावत दिसत आहे.

जुलैमध्ये सलामी जून महिन्याचा शेवटचा दिवस 30 जून आणि जुलै महिन्याच्या पहिली तारीख अशा दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. 24 कॅरेट सोने 320 रुपयांनी वधारले. भाव 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 22 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली. हा भाव प्रति 10 ग्रॅम 54,300 रुपयांवर आला. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.

शनिवार-रविवार भाव जाहीर नाही इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन दररोजचे भाव जाहीर करते. देशभरात शनिवार-रविवार आणि केंद्राने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीचे दर जाहीर करण्यात येत नाही. या दिवशी सराफा बाजारात शुक्रवारच्या आधारे किंमती अपडेट होतात.

हे सुद्धा वाचा

जूनमध्ये मोठी उसळी नाही गुडरिटर्न्सनुसार,जून महिन्यात सोन्याच्या आघाडीवर दिलासा मिळाला. 1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले होते. 29 जून रोजी पुन्हा घसरण झाली. हा भाव 58,900 रुपयांवर आला होता. 30 जून रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 59,000 रुपयांवर पोहचले.

मे महिन्याने आणली आनंदवार्ता मे महिन्यात सोने 70 हजारांचा तर चांदी 80,000 हजारांचा टप्पा ओलांडेल असा तज्ज्ञांचा व्होरा होता. पण मे महिन्यात आनंदवार्ता आली. दोन्ही धातूंच्या किंमती झटपट उतरल्या. सोने-चांदीला नवीन रेकॉर्ड गाठता आला नाही. उलट किंमती 59,000 रुपयांपर्यंत खाली आल्या. जुलै महिन्यात या किंमतीत किती घसरण होते, हे समोर येईल.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 30 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,055 रुपये, 23 कॅरेट 57,823 रुपये, 22 कॅरेट सोने 53,178 रुपये, 18 कॅरेट 43,541 रुपये आणि 14 कॅरेट सोने 33962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. हा भाव शुक्रवारचा आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...