Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold investment : सोन्याच्या दरात तेजी येणार? गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

जगभरात महागाई (inflation) आहे, मंदीची शक्यताही बळावलीये. म्हणजेच सोन्याचे भाव (Gold rates) वाढण्यास एकदम अनुकूल परिस्थिती आहे. त्यातच जगभरातील सर्वच मध्यवर्ती बँका (central bank) सोन्याचा साठा वाढवत आहेत.

Gold investment : सोन्याच्या दरात तेजी येणार? गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 2:10 AM

जगभरात महागाई (inflation) आहे, मंदीची शक्यताही बळावलीये. म्हणजेच सोन्याचे भाव (Gold rates) वाढण्यास एकदम अनुकूल परिस्थिती आहे. त्यातच जगभरातील सर्वच मध्यवर्ती बँका (central bank) सोन्याचा साठा वाढवत आहेत. या सर्वबाबी असूनही सोन्याचा भाव कमी होत आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याचा दर 1,800 रुपयांनी कमी झालाय. कमी दर आणि गुंतवणुकीचे वातावरण असतानाही गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स त्यांच्या साठ्यातून सोनं विकत आहेत. यावर्षी एप्रिलपर्यंत जगभरातील गोल्ड ईटीएफकडे जवळपास 3874 टनांहून अधिक सोन्याचा साठा होता. मात्र, जुलै अखेरपर्यंत सोन्याच्या साठ्यात घट होऊन तो 3,708 टनांवर पोहोचलाय. यातील जवळपास 81 टन सोन्याची विक्री जुलै महिन्यात झालीये. एकीकडे गोल्ड ETF सोन्याची विक्री करत असताना दुसरीकडे मात्र जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याचे भाव कमी झाल्यानं सोनं खरदी करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केलीये. आरबीआयनं जुलै महिन्यात 13.4 टन सोन्याची खरेदी केलीये.आरबीआयकडे असलेला सोन्याचा एकूण साठा 783.1 टन इतका उच्चांकी स्तरावर पोहचलाय.

स्पॉट मार्केटमध्येही सोन्याला मागणी

फक्त मध्यवर्ती बँकच नाही तर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याची मागणी वाढलीये. सोन्याचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या स्वित्झर्लंडनं जुलै महिन्यात चीनमध्ये 80 टनांहून अधिक सोन्याची निर्यात केलीये. सोन्याच्या आयातीत चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. जुलै महिन्यात चीनमध्ये झालेली सोन्याची निर्यात 67 महिन्यातील सर्वात जास्त आहे.चीन आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदीचा सपाटा लावला असतानाही सोन्याचे दर वाढण्याऐवजी कमीच होत आहेत. डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याचे दर वाढत नाहीत असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्याच्या दरात तेजी येणार

मंदी आणि महागाईच्या काळात डॉलरमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुढे आल्यानं डॉलर मजबूत झालाय. त्यामुळेच गोल्ड ETF सुद्धा सोनं विकून डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. अशी माहिती ऑगमोंट गोल्डच्या रिसर्च हेड रनीशा चेनानी यांनी दिली आहे. मात्र, दीर्घ कालावधीचा विचार करता सोन्यात तेजी येऊ शकते आणि त्यामुळेच जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याच्या खरेदीवर जोर देत आहेत, असं चेनानी यांनी म्हटलं आहे.आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या दरात तेजी आलीये, असा जुना ट्रेंड आहे. त्यामुळेच महागाई आणि मंदीच्या सावटामुळे दीर्घाकालावधीसाठी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.