Gold Silver Price : सोन्यामुळे गुंतवणूकदार मालामाल, चांदीने केली कमाल, आजचा भाव काय

Gold Silver Price : जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्या-चांदीतील गुंतवणुकीने अनेकांना मालामाल केले. आजचा भाव जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदी (Gold Silver Price Update) नवीन विक्रम करतील.

Gold Silver Price : सोन्यामुळे गुंतवणूकदार मालामाल, चांदीने केली कमाल, आजचा भाव काय
असा मिळाला परतावा
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 10:03 AM

नवी दिल्ली : देशात सोने-चांदीने अवघ्या तिमाहीत गुंतवणूकदारांना मालामाल केले. सध्या शेअर बाजारापासून बँकिंग सेक्टरपर्यंत अस्थिर वातावरण आहे. अमेरिकेसह युरोपियन देशातील बँकांना ग्रहण लागले आहे. याठिकाणी महागाईचा कहर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यात (Investment in Gold) गुंतवणूक वाढवली. पण सोन्यापेक्षा चांदीने (Silver Return) गुंतवणूकदारांना अधिक परतावा दिला आहे. जानेवारी ते मार्च, या तिमाहीत या किंमती धातूंनी जोरदार परतावा दिला आहे. शनिवार, रविवारी आयबीजीए सोन्याचे भाव जाहीर करत नाही. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात ही परिस्थिती कायम राहिल्यास सोने आणि चांदी (Gold Silver Price Update) नवीन विक्रम करतील.

सोन्याची आगेकूच

शुक्रवारी सराफा बाजारातील भाव अपडेट झाले. आयबीजीएने दर जाहीर केले. त्यानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,715 रुपये तर संध्याकाळी ही किंमत 59,751 रुपये होती. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 59,476 रुपये तर संध्याकाळी 59,512 रुपये होती. बुधवारी सोने 370 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढले. हा भाव 59335 रुपये प्रति तोळा होता. मंगळवारी सोने 58965 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते.

हे सुद्धा वाचा

चांदी पण विक्रमाच्या दिशेने

चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. चांदीचा आलेख उंचावत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. एक किलो चांदी 73000 रुपयांच्या आता बाहेर खेळत आहे. चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचा कालचा भाव 73000 रुपये होता. आज हा भाव 74000 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती.

अशी झाली कमाई

सोन्याने भावात एक विक्रम केला होता. पण कमाई झाली ती चांदीमुळे. मार्च महिन्यातील 30 दिवसांत गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि चीनमधील परिस्थिती सुधारत असल्याने चांदीची (Silver Return) मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अचंबित झाले आहे.

हॉलमार्क क्रमांक अनिवार्य

ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

एका मिस्ड कॉलवर भाव

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.