अवघ्या 30 मिनिटांत मिळणार 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज, BharatPe ची नवीन योजना
फिन्टेक कंपनी भारतपेने (Bharatpay) आपल्या व्यापारी भागीदारांसाठी सुवर्ण कर्ज योजना (Gold Loan) सुरू केली आहे. याबरोबरच कंपनीने कर्ज विभागात ही पाऊल टाकले आहे. कंपनी सध्या अंतर्गत वादात सापडली आहे.
मुंबई : फिन्टेक कंपनी भारतपेने (Bharatpay) आपल्या व्यापारी भागीदारांसाठी सुवर्ण कर्ज योजना (Gold Loan) सुरू केली आहे. याबरोबरच कंपनीने कर्ज विभागात ही पाऊल टाकले आहे. कंपनी सध्या अंतर्गत वादात सापडली आहे. भारतपेने अलीकडेच आपले संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांना या कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच कंपनी अंमलबजावणी यंत्रणांच्या रडारवर आहे. कंपनीच्या विविध चौकश्या सुरू आहेत. ही कंपनी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची सहप्रवर्तकही (Co Promotor) आहे. व्यापाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे सोने तारण कर्ज देण्यासाठी भारतपेने नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सुरू केली आहे. सोने तारण योजना सहा महिने, नऊ महिने आणि 12 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देते. डोअरस्टेप तसेच शाखा संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि हैदराबादमधील भारतपेच्या व्यापारी ग्राहकांसाठी ही सेवा आधीपासूनच सुरू होती. या वर्षाअखेरपर्यंत 20 शहरांपर्यंत त्याचा विस्तार करण्यात येणार असून, 500 कोटी रुपयांचे सुवर्ण कर्ज वितरित होण्याची शक्यता आहे.
30 मिनिटांत कर्ज मिळवा
सोन्यावरील कर्ज दरमहा 0.39 टक्के किंवा वार्षिक 4.68 टक्के व्याजदराने दिले जाईल. कर्ज अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. कंपनीने 30 मिनिटांत कर्जाचे निराकरण केल्याचा दावा केला आहे.
तुम्ही किती कालावधीसाठी कर्ज घेऊ शकता?
भारतपेचे चीफ एक्झिक्युटिव्ह सुहैल समीर म्हणाले, ‘सोन्यावर आधारित सुवर्ण कर्ज योजनेसह आम्ही सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. सोने कर्ज आम्हाला व्यापारी भागीदारांना अधिक सक्षम करण्यास आणि कोट्यवधी छोट्या व्यवसायांना मदत करण्यास सक्षम करेल. दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना आम्ही सुरू केली होती. त्यावेळी आम्ही 10 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. या काळात हा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता.
सहा महिने, नऊ महिने आणि 12 महिन्यांच्या कालावधीत ही कर्ज योजना उपलब्ध आहे. डोअरस्टेप तसेच शाखेतून कर्ज संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतपे सुरू झाल्यापासून ऑफलाइन व्यापारी आणि किराणा स्टोअर मालकांना सात लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित कर्ज देण्यात येणार आहे.
आतापर्यंत 3 लाख व्यापारी भागीदारांना 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे वितरित केली असून, अशा कर्जांचा कालावधी 3, 6 व 12 महिन्यांचा आहे. कंपनीने म्हटले आहे की, भागीदार व्यापारी भारतपे अॅपवर प्राप्त कर्ज बघु शकतात आणि केवळ अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. कर्जाच्या परतफेडीसाठी ईएमआय पर्याय लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
अशनीर ग्रोव्हर यांचा राजीनामा
या महिन्याच्या सुरुवातीला भारतपेचे सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी कंपनी आणि त्यांच्या बोर्डावरील पदाचा राजीनामा दिला आहे. एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर हा वाद सुरू झाला. ज्यामध्ये त्याने कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
इतर बातम्या
रशिया-युक्रेन युद्धाचे ढग LIC IPO वर? लाँचबद्दल नेमकं काय म्हणाल्या अर्थमंत्री