Gold or Share : सोने की शेअर, गेल्या पाच वर्षांत कोणी दिला सर्वाधिक रिटर्न

Gold or Share Return : सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तेजी आली आहे. गेल्या महिन्यात या किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या होत्या. जगभरातील केंद्रीय बँका सोन्याचा साठा करत आहे. तर चीनमध्ये खरेदी वाढल्याने किंमती भडकल्या आहेत.

Gold or Share : सोने की शेअर, गेल्या पाच वर्षांत कोणी दिला सर्वाधिक रिटर्न
सोने की शेअर, कुणी किती दिला परतावा
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 4:56 PM

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

यंदा सोन्याचा किती रिटर्न

एंबिट ग्लोबल प्रायव्हेट क्लाईंटच्या सीईओ अमृता फरमाहन यांनी एक दावा केला आहे. त्यानुसार, यावर्षात आतापर्यंत जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत जवळपास 20% म्हणजे 2,390 डॉलर प्रति औसवर पोहचले आहे. गेल्या महिन्यात काही ठराविक काळासाठी सोन्याने 2,400 डॉलरला टप्पा गाठला होता. हा आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे.

हे सुद्धा वाचा

का वाढत आहेत किंमती

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि युरोपीय संघावर कर्जाचा डोलारा वाढला आहे. परिणाम सोन्याची मागणी वाढली आहे. अनेक देशाचे चलन डॉलरच्या तुलनेत घसरणीवर असल्याने अनेक देशांच्या केंद्रीय बँका सोन्यात गुंतवणूक करत आहेत. चीनमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सोन्याची बंपर खरेदी सुरु केली आहे. चीनमध्ये रिअल एस्टेट संकटात आहेत. तर शेअर बाजार पण डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे नागरिकांचा ओढा सोन्याकडे वाढला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,934 रुपये, 23 कॅरेट 72,642 रुपये, 22 कॅरेट सोने 66,808 रुपये झाले. 18 कॅरेट 54,701 रुपये, 14 कॅरेट सोने 42,666 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 84,505 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

9 वर्षांचा काय आहे पॅटर्न

वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.