मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold/Silver Price) मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोने 0.17 टक्क्यांनी घसरले. तर डिसेंबर वायदा चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी घसरला आहे.
अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे आणि कोविड-19 च्या केसेसमध्ये घट झाल्यामुळे ज्वेलर्स धनत्रयोदशी-दिवाळी दरम्यान जोरदार विक्रीची अपेक्षा करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानेही खरेदी जोरदार होण्याची अपेक्षा आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरून 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे हे घडले. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. सोमवारी चांदीचा भावही 230 रुपयांनी घसरून 63,014 रुपये प्रति किलोवर आला होता. मागील व्यापारात त्याची किंमत 63,244 रुपये प्रति किलो होती.
हे अत्यंत महत्वाचे
जर एखाद्या व्यक्तीने या मर्यादेपेक्षा जास्त सोने घरात ठेवले असेल. तर त्यांना त्या सोन्यामागील उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल. जर सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला उत्पन्नाचा स्रोत, गुंतवणुकीचा पुरावा तयार ठेवावा लागतो. ज्याच्या मदतीने तुम्ही आयकर रिटर्नमध्ये गुंतवणुकीचा स्रोत सांगू शकता. भेटवस्तूंमध्ये मिळालेल्या सोन्यासाठी तुम्हाला कोणता पुरावा ठेवावा लागेल हे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइसबद्दल समजून घ्यावे लागेल. यासाठी तुम्हाला भेट पावती ठेवावी लागेल.
संबंधित बातम्या :
Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून ‘हा’ नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!
70 हजार गुंतवून सुरू करा व्यवसाय, लाखोंच्या कमाईची संधी, सरकार 30% सबसिडी देणार
(Gold Price A big drop in the price of gold on the day of Dhanteras)