Gold Price : 1 हजार रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या आजचा दर
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची किंमत 198 रुपयांनी वाढली आहे.
मुंबई : कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर कमी झालेल्या सोन्याच्या किमतीत आज 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची किंमत 198 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता 1 तोळा सोन्याची किंमत 48 हजार 480 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. सोमवारी सोन्याचा भाव 48 हजार 282 रुपये प्रति तोळा होता. चांदीच्या भावातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारचा चांदीचा भाव 1 हजार 8 रुपयांनी वाढून 65 हजार 340 रुपये झाला आहे. सोमवारी 1 किलो चांदीची किंमत 64 ङजार 332 रुपये होते.(Gold price rises by Rs 1,000, what is today’s price?)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ होताचा दिसून येत आहे. investing.com या वेबसाईटनुसार फेब्रुवारी डिलिव्हरी असणारं सोनं 12.15 डॉलरच्या तेजीसह 1842.05 प्रति औंसच्या दरात ट्रेड करत आहे. त्यानुसारच मार्च डिलिव्हरी वाली चांदी आज 0.45 डॉलरच्या तेजीसह 25.32 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे.
19 जानेवारीला कोणत्या शहरात सोन्याची किंमत काय?
22 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति तोळा)
सूरत – 48, 530 हैदराबाद – 45, 650 मुंबई – 48, 000 पुणे – 48, 000 अहमदाबाद – 48, 530 जयपूर – 47, 800 लखनऊ – 47, 800 पटना – 48, 000
24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति तोळा)
मुंबई – 49, 000 पुणे – 49, 000 सूरत – 50, 330 पटना – 49, 000 लखनऊ – 52. 150 जयपूर – 52, 150 अहमदाबाद – 50, 530 हैदराबाद – 49, 800
घरबसल्या 1 रुपयात सोने खरेदी करा!
अपस्टॉक्स (आरकेएसव्ही सिक्युरिटीज ज्याला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) ही भारतातील एक डिजिटल ब्रोकरेज फर्म आहे. आता कंपनीने डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म बाजारात आणलाय. स्टॉक मार्केट्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त आता आपण गुंतवणूक अपस्टॉक्सद्वारे सोन्यात ऑनलाईन गुंतवणूक करू शकता. सध्या अपस्टॉक्सचे 20 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
अपस्टॉक्सने ऑगमोंटबरोबर करार केला असून, अवघ्या एका रुपयात सोन्यात गुंतवणूक केलीय. आता या माध्यमातून डिजिटल सोन्यात केवळ एक रुपयाची गुंतवणूक होऊ शकते. अपस्टॉक्स डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक थेट बाजार दरावर 99.9% शुद्धतेसह 24 कॅरेट डिजिटल सोन्याचे खरेदी करू शकतात, ज्यांचे बाजारभाव प्लॅटफॉर्मवर रिअल-टाइम आधारावर अद्ययावत केले जातात.
संबंधित बातम्या :
सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड
Gold Silver Price Updates : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीला झळाळी, वाचा आजचे दर…
Gold price rises by Rs 1,000, what is today’s price?