गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावांत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारीही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी घसरले आहेत. अमेरिकी डॉलरची किंमत वाढल्याने सोन्याचे दर गेल्या 3 आठवड्यात सगळ्यात कमी अंकानी घसरले आहेत. याचा परिणाम घरेलू बाजारावरही पाहायला मिळाला.
कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर आज सोने-चांदीचे भाव घसरले आहेत. एमसीएक्सवर आज डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याचे दर 0.55% टक्क्यांनी कमी होऊन 50,826 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहेत. तर चांदीचा वायदा भाव 1.2 टक्क्यांनी कमी होऊन 62,343 प्रति किलो ग्रॅमवर आला आहे.
उच्चांकी स्तरावर सोनं आतापर्यंत 5374 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकं स्वस्त झालं होतं.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज अगदी कमी होती. परदेशी बाजारात सोनं 0.1 टक्क्यांनी घसरत 1919.51 डॉलर प्रति औंसवर आलं तर चांदीचा भाव 0.4 टक्क्यांनी घसरत 25.02 डॉलर प्रति औंसवर होता.
सोन्याची नवी किंमत (Gold Price, 12th October 2020) - सोमवारी दिल्ली सराफा बाजारात 240 रुपये प्रति 10 ग्रॅमनं सोनं महागलं होतं. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव वाढून 52,073 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. तर याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,833 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीची नवी किंमत (Silver Price, 12th October 2020) - सोमवारी चांदीचे भावही वधारले होते. चांदीचे दर 786 रुपये प्रति किलो ग्रॅमने वाढून 64,927 रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचली होती. शुक्रवारी चांदीचे भाव 64,141 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलोग्रॅम 786 रुपये वाढ झाली आहे.
जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.