नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचा भाव लवकरच नवीन उच्चांक (Gold Record) गाठेल. वायदे बाजारातील (Multi Commodity Exchange-MCX) तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सोने-चांदीचा भाव (Gold Silver Rate) आणखी वाढेल. सोन्यातील मामूली घसरण गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी ठरणार आहे. कमी किंमतीत सोने घेऊन ते जास्त भावाने विक्री करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. सोन्याची आगेकूच सुरुच आहे. सोन्याच्या दरात 2022 मध्ये जवळपास 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर सलग 10 व्या आठवड्यात वाढला आहे.
गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) फेब्रुवारी 2023 मध्ये सोन्याचा व्यापारी करारात 1.38 टक्क्यांची कमाई दिसून येत आहे. हा भाव 55,730 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आहे. फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळण्याचा दावा करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत जवळपास 2.36 टक्क्यांची वाढ झाली. 1,865 डॉलर प्रति औसवर तो बंद झाला. भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 55 हजार रुपयांवर व्यापार करत आहे. हा भाव येत्या आठवड्यात अजून वाढण्याची शक्यता आहे.
वायदे बाजारात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. US Fed ने दिलेल्या संकेतामुळे बाजारात आर्थिक मंदीची भीती वीढली आहे. त्यामुळे डॉलच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
जगातील इतर देशांची चलन अमेरिकन डॉलरच्या मुकाबल्यात मजबूत होण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेत सध्या नोकरीच्या संध्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मंदीची आशंका बळावली आहे. परिणामी अमेरिकन केंद्रीय बँक व्याजदर वाढवणार नसल्याचा अंदाज आहे .
येत्या आठवड्यात गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणुकीतून नफा कमावण्याची संधी मिळू शकते. बाजारात सोन्याचा भाव घसरला तरी, येत्या काही दिवसात सोन्याचा भाव पुन्हा वधारणार असल्याने त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल. ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वायदे बाजारातील तज्ज्ञांनुसार, सध्या सोन्याच्या 54,700 रुपये भावाला मदत मिळत आहे. येत्या काही दिवसात सोन्याचा भाव 55,200 पर्यंत वाढू शकतो. येत्या आठवड्यात सोन्याच्या किंमती 54,500 च्यावरच राहतील. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
चांदीच्या किंमतीत चढउतार होत असला तरी येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे. चांदीच्या किंमती 80,000 ते 90,000 हजार रुपये होऊ शकतात. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सोन्यापेक्षा चांदी जास्त कमाई करुन देईल.