सोन्याने आजवरचा उच्चांग गाठला, प्रति 10 ग्रामचा भाव 38 हजार रुपये

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 1,113 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याच्या भावाने उच्चांग गाठला. सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 37,920 रुपये इतका आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचं चित्र आहे.

सोन्याने आजवरचा उच्चांग गाठला, प्रति 10 ग्रामचा भाव 38 हजार रुपये
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 8:14 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 1,113 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याच्या दराने उच्चांग गाठला. सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 37,920 रुपये इतका आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचं चित्र आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले आहेत. त्याचा परिणाम आता राष्ट्रीय बाजारपेठेतही दिसू लागला आहे. बुधवारी सोन्याने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठला.

सोन्याचे भाव का वाढले?

आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढताच स्थानिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली, त्यामुळे सोन्याच्या दरात तात्काळ वाढ झाली, असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. याशिवाय, गुंतवणूकदारांकडून सातत्याने खरेदी होत असल्याने सोन्याच्या भावात ही वाढ दिसून आल्याचंही त्यांनी सांगितलं.

न्यूयॉर्कमधील सोन्याचे दर

जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 1,487.20 डॉलर प्रति औंस आहेत. तर चांदीचा भाव 16.81 डॉलर प्रति औंस इतका आहे.

“37,920 प्रति 10 ग्राम हा देशातील बाजारपेठेतील सोन्याचा आजपर्यंतचा सर्वाधिक भाव आहे”, अशी माहिती अखिल भारतीय सराफा असोसीएशनचे उपाध्यक्ष सुरेन्द्र जैन यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सततत वाढ होत आहे. सोमवारी (5 ऑगस्ट) सोन्याचा भाव 36,970 रुपयांपर्यंत वाढला होता.

दिल्लीत सोन्याचे भाव

देशाची राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1,113 रुपयांनी वधारुन 37,920 रुपये झाला. तर 99.5 टक्के शुद्ध सोनं हे 1,115 रुपयांनी वधारुन 37,750 रुपये प्रति 10 ग्राम इतके झाले.

चांदीनेही मोठी उसळी मारली

औद्योगिक संस्था आणि नाणी उत्पादकांच्या वाढत्या मागणीमुळे चांदीचा भावही 650 रुपयांनी वधारुन 43,670 रुपये प्रति किलो झाला. तयार चांदींची किंमत 650 रुपयांनी वाढून 43,670 रुपये झाली. तर, चांदीची साप्ताहिक वितरण किंमत 694 रुपयांनी वाढून 43,670 रुपये किलो झाली आहे.

संबधित बातम्या :

सोनेदराचा सहा वर्षातील उच्चांक, जळगावात सोन्याचे दर…..

जळगावात सोने दर 34 हजारावर, पाकिस्तानात प्रतितोळा 80 हजार 500

बजेटपूर्वी सोने दर 34 हजार 300, दोन तासात सोने दरात 1400 रुपये वाढ

पुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.