Gold Rate : सोने खरेदीवर मोठी सूट! मागणी नसल्याने सराफा बाजारात ग्राहकांसाठी खास ऑफर्स

Gold Rate : सोने खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे..

Gold Rate : सोने खरेदीवर मोठी सूट! मागणी नसल्याने सराफा बाजारात ग्राहकांसाठी खास ऑफर्स
सोन्यावर डिस्काऊंटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 4:47 PM

नवी दिल्ली : जर सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करण्याची योजना आखत असाल अथवा सोने खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुमच्या सराफा बाजारात कुठेतरी डिस्काऊंट ऑफर्सचा (Discount Offers) फायदा मिळेलच. सध्या अनेक ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्यांवर आणि घडणवळीवर सवलत देत आहेत. सोन्याने अचानक उसळी घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी सोने खरेदीत हात आखडता घेतला आहे. सोने खरेदीसाठी ग्राहक धजावत नसल्याने अनेक ज्वेलर्सने ऑफर्सचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे ग्राहकांची सराफा पेठेत (Sarafa Market) वर्दळ वाढण्याची आशा आहे.

भारतात सोन्याच्या किंमतीवर पूर्वीपेक्षा आता अधिक सवलत मिळत आहे. सोन्याच्या किंमतींचा आलेख चढता राहिल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार धास्तावले आहेत. त्यांनी पाठ फिरवल्याने सराफा पेठेत वर्दळ कमी झाली. त्यामुळे आता अनेक ज्वेलर्संनी खरेदीवर सवलत जाहीर केली आहे.

सोने डीलर्सने घरगुती बाजारात 25 डॉलर प्रति औसची सवलत जाहीर केली आहे. यामध्ये 15% आयात आणि 3% विक्री शुल्काचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात डीलर्सनी 20 डॉलरची सवलत घोषीत केली होती. त्यामुळे सराफा बाजारात सध्या सवलतीचे वारे जोरात वाहत आहे.

हे सुद्धा वाचा

मनी कंट्रोलने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, मुंबईतील सोन्याचे घाऊक व्यापारी अशोक जैन यांनी सांगितले की, सोन्यातील अचानक झालेल्या भाववाढीमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे ते बाजाराकडे फिरकेनात. ग्राहक भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच किंमती वरचढ ठरल्या आहेत. मुंबईत खासगी बँकांच्या डीलर्सनी दावा केला आहे की, सोन्याच्या वाढत्या किंमतींनी लग्नसराईच्या आनंदावर विरजण घातले आहे. त्यामुळे वधू-वर पक्ष सोन्याची खरेदी उशीरा करण्यावर भर देत आहे.

16 डिसेंबर रोजी सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 54,222 रुपये मोजावे लागले. तर एक किलो चांदीच्या किंमती घसरल्या. सध्या चांदीचा भाव 68,001 प्रति किलो आहे. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या भावात 107 रुपयांची वाढ झाली होती. तर चांदी 120 रुपयांनी स्वस्त झाली होती.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.