Gold Price Today : सोन्याचे दर पाच आठवड्यांत झरझर उतरले, इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

Gold Price Today : सोन्याच्या किंमती झरझर घसरल्या आहेत. गेल्या पाच आठवड्यात सोने नीच्चांकीस्तरावर पोहचले आहे. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम केला होता. सोन्याने 58000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पुढील आठवड्यात सोने-चांदीचे भाव काय असतील?

Gold Price Today : सोन्याचे दर पाच आठवड्यांत झरझर उतरले, इतक्या रुपयांनी झाले स्वस्त
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली : अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याज दरात वाढ केली. त्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या आर्थिक आकड्यांमुळे वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत चढउतार होत राहील. शुक्रवारी वायदे बाजारात एप्रिल 2023 साठीच्या भविष्यातील सौद्यासाठी सोन्याची किंमत नीच्चांकी आहे. गेल्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याचे फ्युचर ट्रेड (Future Trade) कमी नोंदविण्यात आला आहे. सोन्याच्या किंमती झरझर घसरल्या आहेत. गेल्या पाच आठवड्यात सोने नीच्चांकी स्तरावर पोहचले आहे. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम केला होता. सोन्याने 58000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पुढील आठवड्यात सोने-चांदीचे भाव (Gold Silver Rate) काय असतील?

वायदे बाजारात सोने काल 56,255 प्रति 10 वर बंद झाले. गेल्या शुक्रवारी हा भाव 56,780 प्रति 10 होते. म्हणजे आठवड्यात हा भाव 525 रुपयांनी कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 24 डॉलर प्रति औस घसरण झाली आणि हा भाव 1,841 डॉलर प्रति औसवर बंद झाला.

अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात वाढ केल्याने चिंता वाढली आहे. आता अमेरिकन डॉलर मजबूत होईल. त्यामुळे इतर देशाच्या चलनावर त्याचा परिणाम दिसून येईल. डॉलर इंडेक्स 103 अंकांनी घसरला आहे. पण गुरुवारी हा पुन्हा 104 अंकावर परत आला. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतींना ब्रेक लागला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवून त्यांचे कडक धोरण स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर त्याचा दुरागामी परिणाम दिसून येईल. सोन्याने स्थानिक बाजारात सध्या गेल्या पाच आठवड्यांतील नीच्चांक गाठला आहे. महागाई आणि आठवड्यातील बेरोजगारीच्या आकड्यांनी अमेरिकेतील परिस्थिती स्पष्ट केली आहे.

सध्याच्या या घडामोडींमुळे वायदे बाजारात सोने खरेदीदारांनी, गुंतवणूकदारांनी येत्या काही काळात सावध भूमिका घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांच्या मते, सोन्यातील शॉर्ट पोझिशन घेऊ नये. त्यामुळे त्यांना तोटा होऊ शकतो. दीर्घकालावधीसाठी त्यांनी गुंतवणूक करावी.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.