Gold Rate Today | सोन्याचा भाव गडगडला, दोन महिन्यांत सर्वात कमी दर..

Gold Rate Today | देशात सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांतील निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. तर वायदे बाजारात MCX Future वर सोन्याचा भाव 49856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. वायदे बाजारात चांदीतही घसरण झाली आहे. चांदीचा 57,290 रुपये प्रति किलो भाव आहे.

Gold Rate Today | सोन्याचा भाव गडगडला, दोन महिन्यांत सर्वात कमी दर..
सोन्याचा भाव घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 1:32 PM

Gold Rate Today | सोन्याचे दर (Gold Rate )घसरले आहेत. सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांतील निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. तर वायदे बाजारात MCX Future वर सोन्याचा भाव 49856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. वायदे बाजारात चांदीतही घसरण (Silver Price) झाली आहे. चांदीचा 57,290 रुपये प्रति किलो भाव आहे.

पुढील आठवडा महत्वाचा

अमेरिकेत महागाई वाढत आहेत. महागाईवर नियंत्रणासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर थेट परिणाम होईल.

काय आहेत भाव

बुधवारी रुपयात घसरण दिसून आली. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 265 रुपयांनी घसरले. सोन्याचा भाव 50,616 रुपये प्रति 10 झाले. तर न्यूयॉर्क येथील जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. सोन्याचे भाव 1,705 डॉलर प्रति औसवर पोहचले.

हे सुद्धा वाचा

चांदीच्या किंमतीत 786 रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव 57,244 रुपये प्रति किलोवर पोहचला. तर न्यूयॉर्क वायदे बाजारात चांदीत तेजी दिसून आली. चांदीचे दर 19.31 डॉलरवरुन 19.45 डॉलरवर पोहचले.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.