Today Gold Rate : स्वस्त होऊनही सोन्यात तेजी कायम, 10 ग्रॅमसाठी किती खाली होईल खिसा, आजचा भाव काय?

Today Gold Rate : सोन्याच्या भावात घसरण होऊनही तेजी कायम आहे. काय आहे आजचा भाव

Today Gold Rate : स्वस्त होऊनही सोन्यात तेजी कायम, 10 ग्रॅमसाठी किती खाली होईल खिसा, आजचा भाव काय?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या दोन दिवसात सोन्याने हनुमान उडी घेतली. उच्चांकी झेप घेतल्यानंतरही सोने घसरले. पण त्याची तेजी मात्र कायम आहे. वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) गुरुवारी सोन्याने उच्चांक गाठला. सोने सर्वकालीन 58,800 रुपयाच्या किंमतीवर पोहचले. सोन्याने नवीन विक्रम नोंदवला. आज कालच्या तुलनेत सोने 57,800 रुपयांवर (Gold Price Today) आले आहे. कालपेक्षा आज सोन्याचा भाव 1,000 रुपयांनी कमी झाला आहे. सोने आज स्वस्त झाले आहे. सराफा बाजारात घसरन होऊनही सोन्याचा तोरा कायम आहे. सोन्याची किंमत आजही तेज आहे.

सोन्याचा वाढता भाव लक्षात घेता, येत्या काही महिन्यात सोन्याचा किंमत 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल. वायदे बाजाराच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्यात 0.43 टक्क्यांची घसरण झाली. सोने 246 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोने आज सकाळी 11:30 वाजता 57,810 रुपयांवर व्यापार करत होते. सोन्याचा भाव काल 58,114 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. सोन्याच्या किंमतीत एक हजार रुपयांची घसरण झाली. घसरन होऊनही सोन्यातील तेजी कायम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने ग्राहकांची चांदी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण होत होती. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर चांदीत चमक परतली आहे. वायदे बाजारात सुरुवातीला चांदीत 0.2 टक्के, 143 रुपयांची तेजी दिसून आली.

आज चांदीचा भाव 70,347 रुपये प्रति किलोवर व्यापर करत आहे. गुरुवारी चांदीचा भाव 70,204 रुपये प्रति किलो होता. चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  चांदी गुंतवणूकदारांना लवकरच मालामाल करु शकते.

शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. हा भाव 1,930 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होता. तर चांदी सकाळीच चमकली. चांदीचा भाव 23.615 डॉलर प्रति औसवर बंद झाला. चांदीच्या भावात आज वाढ झाली.

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. त्यानुसार भाव ठरतात.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.