Gold Rate : या आठवड्यात सोन्याचा अचानक आपटीबार, यू-टर्नमुळे गुंतवणूकदारांना झटका, आता गुंतवणूक राहील फायद्याची?

Gold Rate : गेल्या आठवड्यात सोन्याच्या आपटी बारनंतर गुंतवणूक फायद्याची राहील का?

Gold Rate : या आठवड्यात सोन्याचा अचानक आपटीबार, यू-टर्नमुळे गुंतवणूकदारांना झटका, आता गुंतवणूक राहील फायद्याची?
सोन्यात तेजीचे सत्रImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 4:52 PM

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) तेजीचे सत्र होते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याची घौडदौड सुरु होती. पण अचानक सोन्याला ब्रेक लागला. सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आला. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी सोन्याचा भाव 53,914 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी सोन्याचा भाव 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. लग्नसराईमुळे (Wedding Season) सोन्याचा आलेख चढता आहे.

पण सोन्याने या आठवड्यात अचानक यू-टर्न घेतल्याने गुंतवणूकदारांना झटका बसला होता. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर राहील का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराबाबतच्या भूमिकेनंतर सोन्याचे भाव पडतील की वाढतील हे स्पष्ट होणार आहे.

या आठवड्यात सोमवारी सोन्याची किंमत 53,972 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. मंगळवारी या भावात घसरण झाली. सोन्यात जवळपास 500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव 53,461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. बुधवारी भावात थोडी सुधारणा झाली.

हे सुद्धा वाचा

बुधवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सोन्याचा भाव 53,594 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर गुरुवारी सोन्याचा भाव 53,792 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी सोन्याला पुन्हा झळाळी आली. सोने चकाकले. शुक्रवारी सोन्याचा भाव 53,914 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

या वर्षी मार्च सोन्याचा भाव सर्वात जास्त होता. सोन्याची किंमत 54.330 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. ही या वर्षातील सर्वात जास्त भाव होता. त्या तुलनेत अजून सोन्याचा भाव कमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली.

सध्या सोन्यात तेजीचे सत्र सुरु असले तरी तज्ज्ञांचे मते अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम यावर होऊ शकतो. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. डॉलरपेक्षा रुपया मजबूत झाला तर सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे सोन्यात लागलीच गुंतवणूक करणे घाईचे होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात.

त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.