Gold Silver Rates : सोन्याची भरारी, आठवडाभरात गुंतवणूकदारांचा खिसा गरम

Gold Silver Rates : सोन्याने आठवडाभरातच मोठी झेप घेतली आहे. गुंतवणूकदारांचा फायदा झाला.

Gold Silver Rates : सोन्याची भरारी, आठवडाभरात गुंतवणूकदारांचा खिसा गरम
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : तीन-चार महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी सुरु आहे. यावेळी सोने सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहे. किंमतीत सातत्याने चढउतार सुरु असला तरी सोने आणि चांदीने जोरदार परतावा दिला आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर सोन्याने जोरदार आगेकूच केली आहे. 50,000 रुपयांच्या खाली घसरण झालेल्या सोन्याने पुन्हा मुसंडी मारली. आज सोन्याचा भाव (Gold Price) 60,000 रुपयांच्या जवळपास आहे. चांदीच्या किंमतीत (Silver Price) घसरण असली तरी चार महिन्यात भावाने घोडदौड केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला चांदीचा भाव 57-59 हजारांच्या दरम्यान होते. चांदीचा भाव 72,200 रुपये किलोवर पोहचला आहे.

तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच 60,000 रुपायांचा पल्ला गाठेल. गेल्या आठवड्यातील किंमतीवर नजर टाकली तर सोन्याची आगेकूच दिसून येईल. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57189 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी हा भाव 57044 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आठवड्याभरात प्रति 10 ग्रॅम सोने 145 रुपयांनी वधारले.

चांदीचा भाव शुक्रवारी 68192 रुपये प्रति किलो होता. आठवडाभरात चांदीच्या दरात चढउतार होत होता. सोमवारी एक किलो चांदी 68273 रुपये होती. म्हणजे एका किलोमागे 81 रुपयांची घसरण होती.

हे सुद्धा वाचा

सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकी किंमतीवरुन 133 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 24 जानेवारी 2023 रोजी सोने 57322 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदी ऑलटाईम हाय किंमतीपेक्षा 6,808 रुपयांनी स्वस्त विक्री होत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 75,000 रुपये होता. एप्रिल 2011 रोजी हा भाव होता.

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.