Gold Rate Today : ऑगस्ट 2020 नंतर सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 10 हजारांची घट

सोन्या-चांदीच्या किंमतीत आज घट झाल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 140 रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

Gold Rate Today : ऑगस्ट 2020 नंतर सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 10 हजारांची घट
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 6:16 PM

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold rate today) आज घट झाल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 140 रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसतं. यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46236 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. तर चांदीही शुक्रवारी 68000 रुपये प्रति किलोवर व्यापार करत 8494 रुपयांहून कमी आहे. मागच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपए प्रति किलोवर बंद झाली होती.

कालही सोन्या-चांदीच्या दरांममध्ये घसरण झाली होती. गुरुवारी सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून आला. तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची उसळी नोंदवली गेलो होती. काल सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46,379 रुपयांच्या भावावर व्यापार करत होता तर एक किलो चांदीची किंमत 69183 रुपये होती.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56200 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर गेली होती. त्यानंतरच्या सहा महिन्यांत सोन्याची किंमत जवळपास 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात चांदीने 78 हजार रुपयांची पातळी गाठली होती. त्यातही आता 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. यावेळी, MCX वर सोन्याच्या डिलीव्हरीमध्ये घट दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीत झालेली ही मोठी घट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे म्हणता येईल.

बजेटनंतर सोन्याच्या किंमतींवर परिणाम

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (buisness news gold silver price today here is the price of 10 gram on mcx)

संबंधित बातम्या – 

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

Petrol Diesel Price : आज मुंबईसह या शहरांमध्ये पुन्हा वाढले पेट्रोलचे भाव, वाचा आजचे दर

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI कडून HFC चे नियम जारी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.