Gold Silver Record : सोने उच्चांकावर, चांदीचीही घोडदौड, केंद्र सरकारने आयात दर वाढवले, माहिती एका क्लिकवर

Gold Silver Record : सोन्याच्या किंमतींनी दोन वर्षांत कमाल केली. 2020 नंतर सोने आणि चांदीची घोडदौड कशी आहे ते पाहुयात..

Gold Silver Record : सोने उच्चांकावर, चांदीचीही घोडदौड, केंद्र सरकारने आयात दर वाढवले, माहिती एका क्लिकवर
नवीन उच्चांक
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली : सोन्याच्या भावाने काल नवा उच्चांक (Gold at Record High) गाठला. भारतीय वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. यापूर्वी ऑगस्ट 2020 च्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तज्ज्ञांच्या मते अमेरिकतील महागाईच्या आकड्यात घसरण झाल्याने डॉलर निर्देशांकात घसरण झाली. त्याचा परिणाम आता सोन्याच्या किंमतींवर दिसत आहे. या सर्व घडामोडींमुळे सोन्याची जोरदार घोडदौड सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने केंद्र सरकारने सोन्याच्या बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली.

शुक्रवारी एमसीईवर सोन्याच्या भावाने रेकॉर्ड केला. व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 56,245 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.बाजार सुरु झाल्यावर हा भाव 55,915 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. बाजार संपत असताना सोन्याची किंमत 56,109 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

सोन्याचा भाव यापूर्वी ऑगस्ट 2020 म्हणजेच जवळपास 29 महिन्यांअगोदर सर्वकालीन उच्चांकी पातळीवर होता. 8 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा भाव 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 56,175 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर सोन्यात घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

चांदीही काही दिवसांपासून चमकत आहे. वायदे बाजारात चांदीच्या भावात यापूर्वीच्या व्यापारी सत्रात संध्याकाळी 65 रुपयांची वृद्धी दिसून आली. चांदी 68,708 रुपये प्रति किलो व्यापार करत होती. दिवसभरात चांदीचा भाव 68,916 रुपये प्रति किलोवर पोहचला होता.

आयआयएफएलचे (IIFL) उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. येत्या 3 ते 6 महिन्यांत सोने 58 हजार ते 60 हजार रुपयांवर पोहचू शकते. डॉलर इंडेक्समध्ये जोरदार घसरण सुरु असल्याचा हा परिणाम आहे.

येत्या काही दिवसांत डॉलर इंडेक्स 100 अंकांहून खाली घसरेल असा दावा गुप्ता यांनी केला. त्याचा परिणाम अर्थात सोने आणि चांदीवर दिसेल. सोन्याचे भाव 60 हजार तर चांदीचा भाव 75 हजार रुपयांचा पल्ला गाठतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली. यामध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली.सोन्याच्या दरात 1.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. काल सोने 1,896.19 डॉलर प्रति औसवर कारभार करत आहे.

तर चांदीच्या भावात 1.33 टक्क्यांची वाढ झाली. हा भाव 23.75 डॉलर प्रति औस होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंची आगेकूच सुरु होती. देशातंर्गत चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....