मुंबई : अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बहुमूल्य धातूंच्या किंमतीत स्थिरता आल्याने व रुपयांचे मूल्य कमी झाल्याने दिल्ली सर्राफा बाजारात शुक्रवारच्या दिवशी सोने (Gold Price Today) 75 रुपये ने वाढले त्याचबरोबर 51,863 प्रति दहा ग्रॅम झाले. HDFC सिक्योरिटीज ने ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बाजारातील भाव प्रति 10 ग्रॅम 51,788 रुपयावर बाजार बंद झाला त्याचबरोबर चांदी ची किंमत (Silver Price Today) 453 रुपयाच्या किंमतीने भाव घसरून कमी होऊन 67,996 रुपये प्रति किलोग्राम वर बाजार बंद झाला. काही दिवसांपूर्वी चांदी 68,449 रुपये प्रति किलोग्राम वर थांबली. रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine) मध्ये तणाव वाढल्या कारणामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. तेलाच्या किंमती वाढल्याने गुंतवणूक धारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारच्या दिवशी डॉलर रुपयाच्या तुलनेत 11 आठवड्याच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे.
फ्यूचर्स ट्रेड मधील किंमती
फ्यूचर्स ट्रेड मध्ये सोन्याच्या किंमती शुक्रवार रोजी 100 रुपयांनी वाढून 51,870 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार, एप्रिल डिलीवरी साठी कॉन्ट्रॅक्ट 100 रुपये किंवा 0.19 टक्के ने वाढली सोबतच 51,870 रुपये प्रति 10 वर ट्रेड चालत आहे.
मुंबई मधील आजचे सोने चांदीचे भाव
देशाची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबई महानगरात आज सोन्याची किंमत 51,482 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. महाराष्ट्रची राजधानीत चांदीचा भाव 67,743 रुपये प्रति किलो ग्रॅम वर पोहचला. आपणास सांगू इच्छितो की ,राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन ने युक्रेन मध्ये लष्करी कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर भविष्यात सोन्याच्या किमती मध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बिजनेस टुडेच्या रिपोर्ट नुसार रशिया आणि यूक्रेन दरम्यान तणावासोबत जागतिक अर्थव्यवस्था कमजोर झालेली आहे. या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या किमती मध्ये विक्रमी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे.