नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती (Gold Rates Today) पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठण्याच्या तयारी असल्याचं दिसून आलंय. सोमवारी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वधारल्या आहेत. सोन 52 हजार रुपये प्रति दहा ग्राम इतक्या दरांवर पोहोचलंय. तर चांदीचे दरही (Silver Rates Today) 67 हजार रुपयांच्या पार गेले आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Gold Market) सोन्या चांदीचे दर सकाळी जारी करण्यात आले. त्यानुसार सोन्यासह चांदीच्याही दरांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दिवस वाढत असून त्याचा फटका सोनं खरेदी करणाऱ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढलेल्या दरांमुळे सोने खरेदीचा उत्साहदेखील मावळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सोन्याचे दर सकाळी आणि संध्याकाळी दररोज जारी केले जाता. ibjarates.com या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 999 प्युअरीटी असलेल्या सोन्याचे दर 52 हजार रुपयांच्या पार गेलेल आहे.
सध्या 999 प्युअरीटी सोन्याचा दर हा 52 हजार 157 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी सकाळी 999 प्युअरिटी असलेल्या सोन्याच्या दरांमध्ये 318 रुपयाची वाढ झाली आहे. तर 995 प्युअरीटी असलेलं सोनं 317 रुपयांनी महागलं आहे.
प्युअरिटी 999
आज सकाळचा दर 67063
सोन्याचे ताजे भाव जाणून घ्यासाठी 8955664433 वर मिसकॉल देऊन तुम्ही हे दर जाणून घेऊ शकता. IBJA कडून शनिवार आणि रविवार वगळता दररोज सोन्याचे दर जाहीर केले जात असतात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.
सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.