Gold Silver Update : सोने खरेदीदारांची चमकले नशीब! एक तोळा सोने झाले इतके स्वस्त

Gold Silver Update : सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या महिन्यातील सर्वोच्च किंमतीपेक्षा त्यांना स्वस्तात सोने खरेदी करता येईल. त्यांना एक तोळ्यामागे मोठी बचत करता येणार आहे. या बचतीतून एक स्वीट ट्रीटही देता येईल.

Gold Silver Update : सोने खरेदीदारांची चमकले नशीब! एक तोळा सोने झाले इतके स्वस्त
आजही स्वस्ताई
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 10:09 AM

नवी दिल्ली : सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या महिन्यातील सर्वोच्च किंमतीपेक्षा त्यांना स्वस्तात सोने खरेदी करता येईल. त्यांना एक तोळ्यामागे मोठी बचत करता येणार आहे. या आठवड्यातील शेवटच्या दिवसात सोन्याच्या भावाने (Gold Price) उसळी घेतली. तर चांदीच्या किंमतीत चढउतार सुरुच होता. शुक्रवारी सोने दिवसभरात 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. चांदीच्या किंमतीत केवळ 2 रुपयांची घसरण झाली. त्यापूर्वी चांदीत (Silver Price) तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी, 11 मार्च, 2023 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 750 रुपये आणि 830 रुपयांनी वधारला.

22 कॅरेट सोने 51,550 रुपयांहून 52,300 रुपये तोळा तर 24 कॅरेट सोने 56,210 रुपयांहून 57,040 रुपयांवर पोहचले. या किंमती सोन्याच्या ऑलटाईम हायच्या जवळपास आल्या असल्या तरी त्यात हजार रुपयांहून अधिकची तफावत आहे. त्यामुळे ग्राहकांना आताही स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. चांदीच्या किंमती अजून अद्ययावत करण्यात आल्या नाहीत. काल हा भाव किलोमागे 65,250 रुपये होता. 2 फेब्रुवारी रोजी चांदी 74,700 रुपये इतका उच्चांकी होती.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

हे सुद्धा वाचा

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

आठवडाभरात अशा बदलल्या किंमती

  1. शुक्रवारी सोन्याचा भाव 383 रुपये प्रति तोळा महगले
  2. गुरुवारी 41 रुपये प्रति 10 ग्रॅम महागून 55286 रुपये झाले
  3. बुधवारी 844 रुपये प्रति 10 ग्रॅमने सोने झाले स्वस्त, भाव 55245 रुपये प्रति तोळा
  4. सोमवारी सोने 14 रुपये प्रति तोळा स्वस्त, 56089 रुपये होता भाव

चांदीने अशी बदलली चाल

  1. शुक्रवारी चांदीत केवळ 2 रुपयांची घसरण, भाव 61791 रुपये प्रति किलो
  2. गुरुवारी चांदी 90 रुपयांनी उतरली, भाव 61793 रुपये प्रति किलो
  3. बुधवारी गुंतवणूकदारांची चांदी, भावात 2383 रुपयांची घसरण, किंमत 61883 रुपये प्रति किलो
  4. मंगळवारी होळीमुळे बाजार होता बंद
  5. सोमवारी चांदीत 127 रुपयांची तेजी, भाव 64266 रुपये प्रति किलोवर बंद
  6. शनिवारी, रविवारी भाव जाहीर होत नाहीत

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.