नवी दिल्ली : देशात गेल्यावर्षी दिवाळीनंतर सोने-चांदीच्या भावात (Gold Silver Rate Today) सातत्याने चढउतार दिसत आहे. त्यातच भावांनी मोठा टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यापर्यंत सोने-चांदी झपझप चढले. सोने-चांदीने किंमतीचे सर्व रेकॉर्ड तोडले. सोने एकाच वर्षात जवळपास 10,000 रुपयांनी वधारले. तर चांदी किलोमागे जवळपास 17000 रुपयांनी महागली आहे. गेल्या एक महिन्यापासून या मौल्यवान धातूंनी नरमाईचे धोरण आखले होते. जून महिन्यातच सोन्यात हजार रुपयांहून अधिकची पडझड झाली. तर चांदीच्या किंमती पण मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीत. मे महिन्यात पण सोने-चांदीला कोणताही नवीन रेकॉर्ड नावावर नोंदविता आला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मात्र या दोन्ही धातूंनी ग्राहकांना धक्क्यावर धक्के दिले होते.
गेल्यावर्षी 11 जून 2022 रोजीचा भाव
दिवसभरात दोन वेळा सोन्या चांदीचे दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार, सकाळून एक भाव असेल तर संध्याकाळी तुम्हाला सोन्या चांदीच्या भावात फरक जाणवू शकतो. ibjarates.com नुसार, 11 जून 2022 रोजी असा भाव होता. 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली होती. सोने प्रति 10 ग्रॅम 50,924 रुपये होते. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भाव वाढला होता. एक किलो चांदीचा भाव 56,466 रुपये होता. 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 11 जून, सोमवारी 50720 रुपये होता. 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 38193 रुपये होता.
आजचा भाव काय
आज 11 जून 2023 रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीचे दर जाहीर झालेले नाहीत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन(ibjarates) शनिवार आणि रविवारी भाव जाहीर करत नाही. सरकारी सुट्टी असेल तर त्यादिवशी भाव जाहीर होत नाही. 10 जून रोजी 22 कॅरेट सोन्यात 100 रुपयांची घसरण होऊन भाव 55,650 रुपयांवर पोहचले. तर 24 कॅरेट सोने 130 रुपयांनी घसरल्याने हा भाव 60,700 रुपयांपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सने हे भाव जाहीर केलेले आहेत. शुक्रवारी सोन्यात 400 रुपयांची वाढ झाली तर चांदीने 1100 रुपयांची चढाई केली होती.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 59976 रुपये, 23 कॅरेट 59736 रुपये, 22 कॅरेट सोने 54938 रुपये, 18 कॅरेट 44982 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35086 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.