Gold Silver Price Update : खरेदीदारांची ‘चांदी’! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीची आनंदवार्ता

Gold Silver Price Update : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीने आनंदवार्ता आणली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार वाढीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पण सलग दोन दिवसांपासून भाव नरमले आहेत.

Gold Silver Price Update : खरेदीदारांची 'चांदी'! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीची आनंदवार्ता
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 9:22 AM

नवी दिल्ली : अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Update) भडकल्या आहेत. सोन्या-चांदीने गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्याने 8 टक्के तर चांदीने 12 टक्के परतावा दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांत एका वर्षाच्या एफडी इतका हा परतावा आहे. यावरुन या दोन्ही मौल्यवान धातूंची गगन भरारी दिसून येते. अजून काही दिवस भावात तेजी राहणार असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडील वाट वळवली आहे.

आज सकाळचा भाव काय गुडरिटर्न्सने आज, मंगळवारी सकाळच्या सत्रातील भावांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यानुसार, सकाळाच्या सत्रात आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 390 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 55,550 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 430 रुपयांनी स्वस्त झाली. आज हा भाव 60,580 रुपये आहे.

कालचा भाव काय इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, काल 10 एप्रिल रोजी 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 60,355 रुपये होती. 23 कॅरेट सोन्याचा भाव 60,115 रुपये, 22 कॅरेट सोने 55,285 रुपये, 18 कॅरेट सोने 45,266 रुपये, तर 14 कॅरेट सोने 35,307 रुपये एक तोळ्याचा भाव आहे. आयबीजेए शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

हॉलमार्कचा संबंध 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

किती शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.