Gold Silver Price Today : चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त

Gold Silver Price Today : 15 एप्रिलपासून सोने-चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली आहे. शनिवार-रविवार, सोमवारपासून भावात नरमाई आहे. त्यामुळे ग्राहकांना सध्या तरी दिलासा आहे. नवीन विक्रम गाठण्यापूर्वी तुम्हाला खरेदीची लगबग करता येईल.

Gold Silver Price Today : चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 9:21 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या (Gold Silver Price) विक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. भावात सातत्याने वाढ होत असताना शनिवारपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरणीवर आहेत. अर्थात ही घसरण फार मोठी असली तरी भावात कुठलेही वाढ झाली नाही, हीच मोठी गोष्ट आहे. गेल्या तीन महिन्यात सोने-चांदीने हनुमान उडी घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले तर ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्यात 8 तर चांदी 12 टक्के परतावा दिला आहे. सोन्याच्या भावाने सहा महिन्यात जवळपास 11 हजारांची उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांना तर सहा महिन्यापूर्वी केलेल्या गुंतवणूकीवर छप्परफाड परतावा मिळाला आहे.आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या.

सोने सत्तर हजारी मनसबदार सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,090 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,180 रुपये होती. सोन्याला 70,000 टप्पा गाठायला आता फार वेळ लागणार नाही. तर चांदीने आज यु-टर्न घेतला असला तरी चांदी लवकरच 80,000 चा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोन्यात 800 रुपयांची घसरण गुडरिटर्न्सनुसार, 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा होते. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,950 रुपये होती. आज 18 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,080 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोने 61,170 रुपयांवर पोहचले. म्हणजे सोन्यात गेल्या चार दिवसांत 800 रुपयांची घसरण कायम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी खरेदीची संधी चांदी 14 जानेवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये शनिवारी 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला. रविवारी आणि सोमवारी हाच भाव कायम होता. मंगळवारी 18 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक कायम ठेवला. भावात वाढ झाली नाही.11 एप्रिलपासून चांदीच्या किंमतीत दरवाढ सुरु होती. सध्या चांदी खरेदीची संधी ग्राहकांना मिळाली आहे.

चार शहरातील भाव गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,930 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,020 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,930 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,020 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,930 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,020 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,960 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,050 रुपये आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.