Today Gold Rate : व्हॅलेंटाईन डेला द्या सुवर्ण भेट! आज सोने-चांदी स्वस्तात खरेदीची संधी!

Today Gold Rate : व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर आज सुवर्णययोग साधाच. आज सोने-चांदी त्याच्या उच्चांकी किंमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे. तुम्हाला स्वस्तात भेटवस्तू देण्यासाठी आजाचा सुवर्णयोग साधता येईल.

Today Gold Rate : व्हॅलेंटाईन डेला द्या सुवर्ण भेट! आज सोने-चांदी स्वस्तात खरेदीची संधी!
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:40 AM

नवी दिल्ली : व्हॅलेंटाईन डेला, आज तुम्हाला सुवर्णयोग साधता येईल. स्वस्तात सोने-चांदी खरेदीची हा संधी आहे. सोमवारी सोन्याच्या भावात (Gold Price Today) थोडीशी तेजी दिसून आली. तर चांदीच्या भावात (Silver Price Today) मोठी घसरण झाली. सोमवारी सोने 22 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झाले. तर चांदीच्या किंमतीत 369 रुपये प्रति किलोची घसरण झाली. त्यामुळे सोने 57000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 67000 रुपये प्रति किलोवर विक्री होत होती. इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनचे (India Bullion And Jewellers Association-IBJA ) भाव 09:26 वाजेपर्यंत सोमवाराचे भाव होते. तर गुड रिटर्ननुसार, सराफा बाजारात आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 52,660 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांची वाढ झाली. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 57,390 रुपये प्रति 10 ग्रॅम असून भावात 10 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याने काही दिवसांपूर्वी त्याचा ऑल टाईम हाय 58,847 रुपये गाठला होता. 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने ही कामगिरी बजावली होती. आताचा विचार करता सोने 1822 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. तर चांदी ही तिच्या ऑल टाईम उच्चांकापेक्षा स्वस्त विक्री होत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो आहे. 13609 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त मिळत आहे.

वायदे बाजारात, एप्रिल 2023 साठी सोन्याचा भाव 56,780 रुपये 10 ग्रॅम स्तरावर आहे. हा भाव सोन्याच्या उच्चांकी स्तरापासून अर्थात 2000 रुपयांनी कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने 57,000, 57,100 रुपयांवर उसळी घेऊ शकते. तर 56,350 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्याच्या किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.