Gold Silver Price Today : सोन्याची गरुड भरारी! तोडले सर्व रेकॉर्ड

Gold Silver Price Today : शनिवारी संध्याकाळी सोन्याने भावात सर्व रेकॉर्ड तोडले. नवीन भावाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. हा रेकॉर्ड काल संध्याकाळी मोडला. आता सोन्याच्या भावाने नवीन ओळख दिली आहे.

Gold Silver Price Today : सोन्याची गरुड भरारी! तोडले सर्व रेकॉर्ड
सोन्याची कमाल उसळी
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 9:11 AM

नवी दिल्ली : सोन्याला महागाईची (Gold Inflation) इंगळी डसली आहे. सोन्याने गगन भरारी घेतली. शनिवारी संध्याकाळी सोन्याने भावात (Gold Price Today) सर्व रेकॉर्ड तोडले. नवीन भावाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. हा रेकॉर्ड काल संध्याकाळी मोडला. आता सोन्याच्या भावाने नवीन ओळख दिली. सोन्याच्या नवीन भावाने सर्वांनाच घाम फोडला आहे. या आठवड्यात सोन्याची ही आगेकूच सर्वांनाच विस्मयचकीत करणारी आहे. पुढील आठवड्यात आता सोने कोणता रेकॉर्ड करते. कोणता विक्रम प्रस्तापित करते, यावर तज्ज्ञांमध्ये खल सुरु आहे. येत्या आठवड्यात सोने 62,000 रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीदार धास्तावले आहेत.

2 फेब्रुवारी रोजी भावात, सोन्याने 58,880 रुपये तोळा तर चांदीने प्रति किलो 74,700 रुपये असा रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने अचानक जोर भरला. भावात एकाएक उसळी आली. सोन्याचे भाव गगनाला भिडले. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोन्याने भलभल्यांना डोके खाजवायला लावले. शनिवारी संध्याकाळी सोन्याने 60,000 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. काही ठिकाणी रविवारी भाव फलकावर सोन्याने 61,000 हजारी धावसंख्या उभारली आहे.

सोन्यासोबतच चांदीने पण मूड बदलला आहे. चांदीत गुरुवारी प्रति किलो 500 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा भाव किलोमागे 69000 रुपये झाला. शुक्रवारी चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली, हा भाव 69,200 रुपये इतका झाला. शनिवारी चांदीत किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली. 18 मार्च रोजी चांदीचा एक किलोचा भाव 69800 रुपये झाला. तर रविवारी चांदीत किलोमागे 2300 रुपयांची दरवाढ झाली. 19 मार्च रोजी चांदीचा भाव 72,100 रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत.  प्रत्येक शहरात भावात स्थानिक कर,  घडवणीचा खर्च यामुळे तफावत दिसून येते.

हे सुद्धा वाचा

आठवड्यातच 3000 रुपयांपेक्षा अधिक उसळी

  1. रविवारी सोन्यात 1630 रुपयांची झाली वाढ
  2. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा
  3. शनिवारी 18 मार्च रोजी सोन्यात 270 रुपयांची वाढ
  4. सोन्याचा भाव 58,840 रुपये प्रति तोळा
  5. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले
  6. गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला
  7. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 100, 110 रुपयांची घसरण झाली होती
  8. बुधवारी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली
  9. मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला
  10. 13 मार्च रोजी सोमवारी सोने प्रति तोळा 56968 रुपये

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.