Gold Silver Rate Today : सोने-चांदीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, दरात पुन्हा घसरण, सध्याचे दर काय?
देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Falls Today)
मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या किंमतीत मोठे बदल पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. सध्या बाजारात सोन्याची किंमत 49 हजार इतकी पाहायला मिळत आहे. तर चांदीची किंमत 65000 इतकी झाली आहे. सोमवारी 25 जानेवारीला सोन्याचा भाव हा 49416 इतका होता. देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Falls Today)
आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात 337 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोन्याची किंमत 49 हजार 079 इतकी झाली होती. तसेच सकाळी सोन्याचा दर 104 रुपये घटल्याने 48975 रुपये इतका झाला.
तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही घट पाहायला मिळाली. 25 जानेवारीला चांदीची किंमत 66 हजार 703 इतकी होती. तर आज चांदीचा भाव 749 रुपयांनी घसरला. त्यामुळे चांदीचा भाव प्रति किलो 65 हजार 954 रुपये इतका झाला. तर संध्याकाळी चांदीच्या किंमतीत 204 रुपयांनी पुन्हा घट झाली. त्यामुळे चांदीचा दर हा 65 हजार 750 इतका झाला.
?मुंबईतील सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये 24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
?पुणे सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये 24 कॅरेट सोने : 49, 320 रुपये चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
?नाशिक सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये 24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
?नागपूर सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये 24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)
सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो. (Gold Silver Price Falls Today)
संबंधित बातम्या :
‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम?
सरकारकडून तुमच्या खिशाला कात्री, हळूहळू बंद होतय घरगुती सिलेंडरचं अनुदान