Gold Silver Price : गुरुवारी सोने-चांदीचे भाव चमकले, पाहा आजचे दर

Gold Silver Price : गुरुवारी सोने-चांदीचे दर महागले, असे आहेत आजचे भाव

Gold Silver Price : गुरुवारी सोने-चांदीचे भाव चमकले, पाहा आजचे दर
आजचे दर काय
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 4:26 PM

नवी दिल्ली : जगासह भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक सुवर्णप्रेमी आहेत. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येते. तसेच सोन्यातून सर्वाधिक परतावा मिळत असल्याचेही सिद्ध झाले आहे. 10-12 वर्षांतच सोन्याचा भाव दुप्पट झाला आहे. सरत्या वर्षांपासून सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate Today) सातत्याने चढउतार होत असला तरी दिवाळी पूर्व भावापेक्षा हा दर प्रचंड वाढला आहे. वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्याच्या भावात आज वृद्धी दिसून आली.

वायदे बाजार सुरु होताच सोन्याच्या भावात वृद्धी दिसून आली. सोन्यात आज 0.21 टक्क्यांची वाढ दिसून आली. सोन्याचा भाव आज 55,792 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर त्यात सकाळी 11:30 वाजता सोने 55,840 रुपयांवर (Gold Price Today) ट्रेड करत होते.

चांदीही आज चमकली. चांदीच्या दरात आज वाढ दिसून आली. वायदे बाजारात चांदीच्या भावात 0.58 टक्क्यांची वाढ होऊन दर 68,349 रुपये झाला. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता चांदी 68,503 रुपये प्रति किलोवर (Silver Price Today) पोहचली. काल सोन्यामध्ये 8 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 363 रुपयांनी घसरली होती.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत सराफा बाजारात काल सोन्याच्या भावात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा दर 89 रुपयांच्या वृद्धीसह 56,126 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्यापूर्वीच्या व्यापारी सत्रात हा भाव 56,037 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

तर चांदीचा दर काल दिल्ली सराफा बाजारात 677 रुपयांची वृद्धी दिसून आली. हा भाव 69,218 रुपये प्रति किलो होता. गुरुवारी चांदीच्या भावात 363 रुपयांची घसरण दिसून आली.  चांदीच्या किंमती येत्या काही दिवसांत सोन्यापेक्षा अधिक परतावा देण्याचा अंदाज आहे.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. तर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.