मुंबई : आज मकरसंक्रांत सण आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय (Gold-Silver Price Today). तर चांदीचे भावही 300 रुपयांनी घसरले आहेत. मुंबईत 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव 66 हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका आहे (Gold-Silver Price Today).
आज सकाळी एमसीएक्सवर सोन्याची डिलिव्हरी दिसते. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 196 रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा 49,230 रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 721 रुपयांनी घसरुन 65,300 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,०00 रुपये प्रति किलो
सोने – 51,021 प्रति तोळा
चांदी – 66,923 प्रति किलो
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
सोने – 50,900 रुपये प्रति तोळा
चांदी – 65,300 रुपये प्रति किलो
सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bonds) ची दहावी मालिकेंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करु शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख 19 जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,104 रुपये ठेवली आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदारानं यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,054 रुपये असेल.
Gold Silver Price Today | सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा दर#GoldPrice #SilverPricehttps://t.co/qvWQVJx6e2
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
Gold-Silver Price Today
संबंधित बातम्या :
सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख
सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर
Gold/Silver Rate Today: तीन दिवसांत दोनदा सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे दर