Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? गेल्या आठवडाभरापासून सोन्याचे भाव कमी

एमसीएक्स वर सोन्याचे आजचे भाव 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर आहेत. तर वायदे बाजारात चांदीचे दर आज 61,000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या वर व्यापार करत आहेत.

Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? गेल्या आठवडाभरापासून सोन्याचे भाव कमी
काय आहेत आज सोन्याचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 2:04 PM

Gold Silver Price in India: भारतीय बाजारात आज सोन्याच्या भावात तेजी आली असली तरी सोने अद्यापही यापूर्वीपेक्षा स्वस्त आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या (Gold Price) दरात 0.06 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर चांदीमध्ये (Silver) 0.24टक्क्यांची प्रति किलोग्रॅम वाढ दिसून आली. यापूर्वीच्या सत्रात सोन्याचा दरात 0.3 टक्क्यांची घसरण झाली होती.तर चांदीची चमक ही 1.1 टक्क्यांची कमी झाली होती. जागतिक बाजारात आज सोन्याचे भाव घसरले. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याचे हे द्योतक आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारावर ही दिसून आला. डॉलर इंडेक्समध्ये (Dollar Index) सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी घसरल. सोने आज 1,836.67 डॉलर प्रति औस होते. गेल्या दोन दशकातील हा भाव सर्वोच्च स्तरावर होता. भुराजकीय वादामुळे सोन्याचे भाव सध्या निम्नस्तरावर आहेत. यामध्ये कमी प्रमाणात खरेदी दिसत आहे. अमेरिकन फेडरलच्या चलनाच्या आक्रमक भूमिकेमुळे सराफा बाजारावर दडपण आले आहे.

सोन्याचे आजचे भाव काय

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,850 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,190 रुपये आहे. पुणे शहरात 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 47,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 52,130 रुपये आहे.तर नाशिकमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,130 रुपये आहे.नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 47,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 52,130 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

Gold Bond मध्ये गुंतवणुकीची संधी

ब-याच कालावधीनंतर सरकार बाजारात पुन्हा गोल्ड बाँड (Gold Bond)घेऊन आली आहे. Sovereign gold bond scheme 2022-23 या योजनेतून सरकार सर्वसामान्यांना सुवर्ण रोखे खरेदी करण्याची संधी आजपासून उपलब्ध करुन देत आहे. देशातील सोन्याची विक्री आणि आयात कमी करण्यासाठी 2015 पासून सरकार प्रयतरत्न आहे. त्यामुळे यंदाही आरबीआयने ही योजना जाहीर केली आहे.20 जूनपासून गुंतवणुकदारांना मिळणार आहे. 24 जूनपर्यंत त्यांना या संधीचा फायदा घेता येईल. या सुवर्ण रोख्यांसाठी इश्यु प्राईस हा 5091 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आला आहे. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने अथवा ऑनलाईन पद्धतीने रक्कम अदा करणार असाल तर तुम्हाला सुवर्ण रोखे योजनेत 50 रुपयांची सवलत मिळेल.याचा सरळ अर्थ तुम्हाला गोल्ड बाँड चा इश्यु प्राईस 5041 रुपयांना पडेल. त्यामुळे प्रति ग्रॅम हा अतिरिक्त फायदा तुम्हाला मिळणार आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही व्यक्तीला एका वेळी 1 ग्रॅम पासून ते 4 किलो ग्रॅमपर्यंतचे मूल्य असलेले सोने खरेदी करता येते. हिंदु अविभक्त कुटुंबासाठी खरेदीची मर्यादा 4 किलोग्रॅम आहे. तर एखाद्या संस्थेसाठी ही मर्यादा 20 किलोग्रॅम आहे.Sovereign gold bond चा कालावधी हा 8 वर्षांचा आहे. तर 5 वर्षात तुम्हाला यातील गुंतवणूक काढता येत नाही. या बाँडवर गुंतवणुकदाराला 2.5 टक्के दराने व्याज प्राप्त होते. तसेच बाँडमधील गुंतवणूक काढताना त्यावेळेच्या सोन्याच्या दरानुसार परतावा मिळतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.